Jawaharlal Nehru Anniversary | Goa News Dainik Gomantak
गोवा

Goa News: पंडित नेहरूंनी दूरदृष्टीने रचला विकसित भारताचा पाया

Goa News: युरी आलेमाव : काँग्रेसतर्फे माजी पंतप्रधानांना अभिवादन

दैनिक गोमन्तक

Goa News: ‘माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या दूरदृष्टीने ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, भाभा अणू संशोधन केंद्र, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी आणि इतर अनेक संस्थांची देशात स्थापना झाली. खऱ्या अर्थाने त्यांनी विकसित देशाचा पाया रोवला’, असे उद्‌गार विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी काढले.

काँग्रेस भवनात पंडित नेहरू जयंती सोहळ्यात ते बोलत होते. याप्रसंगी गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष अमित पाटकर, दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन, हळदोणेचे आमदार ॲड. कार्लोस आल्वारीस फेरेरा, वरिष्ठ उपाध्यक्ष एम. के. शेख, एनएसयूआयचे अध्यक्ष नौशाद चौधरी आदी उपस्थित होते.

पाटकर म्हणाले, नेहरू यांचे गोव्यावर विशेष प्रेम होते. गोव्याच्या अस्मितेची त्यांना नेहमीच काळजी असायची. तत्सम इतिहास हे स्पष्ट करतो की पंडित नेहरूंचा गोवा मुक्ती, जनमत कौल यावर प्रभाव आहे. त्यांच्या दूरदृष्टीचे रूपांतर कालांतराने गोव्याला घटकराज्य दर्जा मिळण्यात झाले.

खासदार सार्दिन म्हणाले, पंडित नेहरू हे जागतिक नेते होते, ज्यांनी जागतिक स्तरावर आदर मिळवला. त्यांची विचारधारा आणि व्हीजन पाळणे, हे भारतातील प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT