Nikhil Desai |Goa News Dainik Gomantak
गोवा

Nikhil Desai Statement Tourism: कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई

Nikhil Desai Statement Tourism: दहा दिवसांत 100 प्रकरणांत 5 ते 10 हजार रुपयांचा दंड निखिल देसाई

दैनिक गोमन्तक

Nikhil Desai Statement Tourism: पर्यटन खात्याने हल्लीच जाहीर केलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर सक्त कारवाईचे सत्र सुरू असून गेल्या दहा दिवसांत सुमारे 100 प्रकरणांमध्ये 5 ते 10 हजार रुपये दंड शुल्क आकारण्यात आले आहे. बेकायदेशीररीत्या व्यवहार करणाऱ्या दलालांवर दररोज कारवाई केली जात आहे, अशी माहिती पर्यटन खात्याचे संचालक निखिल देसाई यांनी दै. ‘गोमन्तक’ला दिली.

काही दिवसांपूर्वी आरोसी समुद्रकिनाऱ्यावर वाहन घेऊन जाणाऱ्या व्‍यक्तीच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. पहिल्यांदा कारवाई करण्यात आली असून यापुढे कायद्याचे उल्लंघन राज्यात खपवून घेतले जाणार नाही, असा स्पष्ट संदेश या कारवाईमार्फत दिला जाणार आहे.

त्या व्यक्तीला नोटीस बजावण्यात आली आहे, आता त्याला सुनावणीसाठी हजर राहावे लागणार आहे. गोव्यात येऊन काहीही करणार ही वृत्ती पर्यटकांनी बदलण्याची आवश्‍यकता आहे. यासाठी पर्यटन उद्योगातील घटकांनी बेकायदेशीर कृत्य होत असल्यास आवाज उठवण्याची आवश्‍यकता आहे, असे आवाहन देसाई यांनी केले.

अंमलबजावणी लगेच यशस्‍वी होणार ही आशा ठेवणे मुळात चुकीचे आहे. कारण आताच सुरवात झाली आहे. कमी काळात देखील बऱ्यापैकी अंमलबजावणी होत आहे. समुद्रकिनाऱ्यावर वाहन घेऊन जाण्याचे प्रकार सध्या जवळपास थांबले आहे. पर्यटन पोलिसांची कमतरता असूनही ही कारवाई केली जात आहे, असे देसाई म्‍हणाले.

नोंदणी न करणाऱ्या हॉटेलांविरुद्धही कारवाई

नोंदणी न करता व्यवहार करणाऱ्या हॉटेल्सच्या विरोधात देखील कारवाई सुरूच आहे. आठवड्याला किमान दोनवेळा नोंदणी न केलेल्या हॉटेल्सचे निरीक्षण खात्याकडून केले जात आहे.

यासंदर्भात हॉटेल्सना नोटीस बजावण्यात आली असून नोंदणी न केल्यास सीलबंद करून त्यांची पाणी आणि वीज जोडणी तोडली जाईल. तसेच किनारपट्टी भागात बेकायदेशीर उभारलेले बांधकाम जमीनदोस्त करण्याचे सत्र सुरू आहे, असे देसाई यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Nightclub Fire: 'पळपुटे' लुथरा बंधू सापडले! फुकेटमधून घेतलं ताब्यात, पासपोर्ट निलंबित; गोवा पोलिसांचे मिशन Successful

Goa Live News: हॉटेलच्या टेरेसवरून पडून पश्चिम बंगालच्या 19 वर्षीय कामगाराचा मृत्यू

Goa Nightclub Fire: क्लब मालकाकडून 25 लाख रुपयांचा हफ्ता पोहोचत होता, माजी आमदार आग्नेल फर्नांडिस यांचा आरोप

Omkar Elephant: ओंकार हत्तीची दोडामार्गात पुन्हा एन्ट्री; बागायतींचे मोठ्या प्रमाणात केलं नुकसान, कळपात परतण्याची शक्यता

ZP Election: डिचोलीत उमेदवारांचे भवितव्य महिला मतदारांच्या हातामध्‍ये! चारही मतदारसंघात 31 हजार 723 मतदार

SCROLL FOR NEXT