Crowd Dainik Gomantak
गोवा

Goa: पणजीत अष्टमीच्या फेरीला प्रचंड गर्दी

Goa: बाप्पाच्या आगमनाला आठवडाच राहिल्याने राज्यात खरेदीला ऊत आला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

बाप्पाच्या आगमनाला आठवडाच राहिल्याने राज्यात खरेदीला ऊत आला आहे. पणजीत भरलेल्‍या अष्टमीच्या फेरीतून सजावटीसाठी लागणारे साहित्य, कपडे तसेच इतर साहित्य जसे की सोफा सेट, विविध प्रकारची भांडी, कपाटे, टेबलक्लॉथ आदी खरेदी करण्‍यास झुंबड उडत आहे. मात्र वाढत्‍या महागाईमुळे सर्वसामान्‍य लोकांना हात आखुडते घ्‍यावे लागत आहेत.

गणेश चतुर्थीत (Ganesh Chaturthi) सजावटीचे साहित्य जसे कृत्रित फुलांचे हार, विविध प्रकारचे पडदे, रोषणाईसाठी लागणाऱ्या विद्युत माळा, थर्माकोलचे मखर, पताका आदी साहित्य दाखल झाले आहे. हारांची किंमत आकाराप्रमाणे, त्याच्या दर्जानुसार 100 ते 450 रूपयांपर्यंत आहे. सजावटीसाठी लागणाऱ्या माळा 100 ते 250 रूपये व त्याहून अधिक किंमतीच्या दरात उपलब्ध आहेत. पूजेसाठी लागणारे साहित्य देखील उपलब्ध झाले आहे.

अष्टमीच्या फेरीला संध्याकाळच्या सुमारास अधिक गर्दी होत आहे. संध्याकाळच्या सुमारास अनेक लोक कामावरून घरी परतताना खरेदी करताना दिसतात. जसजशी चतुर्थी जवळ येत आहे, तसतशी गर्दी वाढत चालली आहे. सजावटीसाठी लागणारे साहित्‍य, फर्निचर, कपडे आदी वस्‍तूंना मोठी मागणी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

Afghanistan Drone Attack: सीमेवरील गोळीबाराचा अफगाणिस्ताननं घेतला बदला! अफगाण वायूसेनेचा पाकिस्तानात घुसून मोठा हवाई हल्ला; दहशतवादी तळ उद्ध्वस्त

Goa Illegal Borewells: हायकोर्टाचा बडगा पण प्रशासनाची सुस्ती? गोव्यात अजूनही 121 बेकायदा बोअरवेल्समधून पाण्याचा उपसा सुरुच

Goa Weather: 4 दिवसांत पाऊस न पडल्‍यास धरणांची अवस्‍था 2023 सारखी! मान्‍सूनने पाठ फिरवल्‍याने जलसाठ्यात मोठी घट

Goa Water Crisis: धरणे आटली, चिंता दाटली..! पाऊस लांबल्‍यास 'ओपा'ला बसणार मोठा फटका; गोव्यातील जलसंकट गडद

SCROLL FOR NEXT