Goa Ganesh Chaturthi: ..हे आहे, गोव्यातील गणेशोत्सवाचे वेगळेपण!

गणेश चतुर्थी हा गोव्यातील सर्वात मोठा सण आहे
Goa Ganesh Chaturthi 2022
Goa Ganesh Chaturthi 2022दैनिक गोमन्तक
Published on
Updated on

गणेश चतुर्थी हा गोव्यातील सर्वात मोठा सण आहे; राज्यात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. संपुर्ण वर्षात या सणाला अनेक कुटुंबे देशभरातून एकत्र येतात. कधीकधी तर जगभर प्रवास करतात. गोव्यात या उत्सवाची तयारी महिनाभर आधीच सुरू होते. सणाची सुरुवात घरोघरी मातीच्या मूर्तीची खरेदी आणि विधीपूर्वक स्थापना करून होते.

(Ganesh Chaturthi biggest festival of Goa)

Goa Ganesh Chaturthi 2022
Astro Tips For Tattoo: शरीरावर धार्मिक टॅटू बनवताना नियमांचे करा पालन

विनायक चवथ

गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi), यालाच विनायक चवथी (Vinayaka Chavithi) असेही म्हणतात, गणेश चतुर्थी हा हिंदू धर्मातील अत्यंत महत्वाचा सण आहे. जो काही लोकांच्यात दिढ दिवस, काही कुटुंबात 5 दिवस तर कुटुंबात 10 दिवस साजरा केला जातो. भद्रापत महिन्यात हा सण हिंदू दिनदर्शिकेनुसार (Hindu calendar) साजरा केला जातो जो साधारणपणे ऑगस्ट ते सप्टेंबरच्या दरम्यान येतो.

माटोळी

गणेशमुर्ती घरी आणून वेदीवर ठेवण्यापूर्वी, फुले, हंगामी भाज्या आणि फळांनी सजलेली माटोळींचा वापर करुन खोली सजवतात. या माटोळींमध्ये अनेक औषधी वनस्पतींचा समावेश आसतो. माटोळी ही सजावट येथील वेगळेपण आहे. गोव्यात हा घरगुती गणेश उत्सव 1½, 5, 7, 9 किंवा 11 दिवसांचा आसतो. घरे, मंदिरे किंवा परिसरातील गणेशमूर्तींसाठी सुंदर सजावट केलेल्या 'मखरात श्री गणेशाची स्थापना केली जाते. पुतळ्याला फुले, पुष्पहार आणि रोषणाईने सुशोभित केले जाते.

Goa Ganesh Chaturthi 2022
Crime News: अत्याचाराचा ठपका ठेवत उपनिरीक्षक पिंगे निलंबित

नैवेद्य

घरात गणेशाच्या नैवेद्यासाठी मोदक, नेवरी, बर्फी, बेसन लाडू आणि काही पारंपारिक चवदार पदार्थ बनवले जातात. गोव्यात नेवरीला जास्त महत्व आहे.

घुमट आरती

गणेश चतुर्थीसाठी इथले लोक त्यांच्या वडिलोपार्जित घरी जातात. मनोभावे पूजा करतात येथे घुमट आरती रोज सकाळ संध्याकाळी होत आसते. गणेश चतुर्थीच्या निमित्ताने गोवेकरांच्या अनेक कला आपल्याला सांस्कृतिक देखाव्यातून, तसेच घुमट आरती मधून बघायला मिळतात. घुमट आरती शिवाय गोव्यातील गणेश चतुर्थी पूर्णच होत नाही. गणेश चतुर्थीच्या कळात अगदी नेमाने रोज घुमट आरती गोव्यात ऐकू येते. आता घुमट आरती म्हणजे काय प्रश्न पडला असेल तर घुमट हे वाद्य आहे. त्याचा एक विशिष्ट ताल धरून म्हटली जाणारी घुमट आरती. ही आरती म्हणण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. घुमट हे मुळात एक मातीचे मडके असते, पण त्याच्या दोन्ही बाजू उघड्या असतात. दोन खुल्या बाजूपैकी एका बाजूने घोरपडीचे चांबडे लावून बंद करतात, व त्याच चांबड्यावर ठेक्यात वाजवल्यास छान प्रकारे आवाज येतो. घुमट हे गोव्याचे स्टेट वाद्य आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com