Vishwajit Rane |Goa News  Dainik Gomantak
गोवा

Vishwajit Rane: पणजी, म्हापसा, ताळगाव, विकास आराखड्याचे मसुदे वेळेतच देऊ!

Vishwajit Rane: खाजन जमीन, जलस्रोतांचे संवर्धन

दैनिक गोमन्तक

Vishwajit Rane: रद्द केलेले पणजी, म्हापसा, ताळगाव आणि बांबोळीच्‍या बाह्य विकास आराखड्याचे (ओडीपी) मसुदे आंतरराष्ट्रीय तज्‍ज्ञांच्या मदतीने नगर नियोजन मंडळ आणि उत्तर गोवा नियोजन विकास प्राधिकरणाच्‍या मार्गदर्शनाखाली वेळेत सादर केले जातील, अशी माहिती नगर नियोजन खात्याचे मंत्री विश्वजीत राणे यांनी दिली आहे.

वादग्रस्त ठरलेले आणि भ्रष्टाचाराचे अनेक आरोप असलेले हे विकास आराखडे नगर नियोजन मंडळाच्या मार्गदर्शनानुसार ऑगस्ट महिन्याच्या शेवटी खुद्द मंत्र्यांनीच रद्द केले होते. हे आराखडे साठ दिवसांत तयार करण्याची अधिसूचना यापूर्वीच जाहीर झाली आहे.

ओडीपी तयार करताना राज्यातील वनसंपदा, नैसर्गिक अधिवास, जंगल, कला व संस्कृती अबाधित राहील, यासाठी शेती, खाजन जमिनी, पाण्याचे स्रोत यात कोणताही बदल होणार नाही, असे यापूर्वी निश्चित केले आहे. यात बदल करण्याचे अधिकार नगरनियोजन प्राधिकरणाला दिले नसल्याचे अधिसूचनेत स्पष्ट म्‍हटले आहे.

पार्कसाठी तजवीज

नव्या आराखड्यात पार्कसाठी जागेची तजवीज असावी. झोनिंग प्लॅनसाठी विनायक भरणे या तज्ज्ञांसह अन्य अभ्‍यासकांचा सल्ला तसेच सूचना लक्षात घेऊन आराखडा तयार करण्यात येत आहे.

मंत्री विश्वजीत राणे म्‍हणतात...

  • पणजी, म्हापसा, ताळगाव आणि बांबोळीचे बाह्य विकास आराखडे (ओडीपी) उत्तर गोवा नियोजन विकास प्राधिकरणाच्या अध्यक्ष तथा आमदार जेनिफर मोन्सेरात यांच्या मार्गदर्शनाखाली बनवण्यात येत आहेत.

  • त्‍यात प्रामुख्याने डोंगर, अभयारण्य, पर्यावरण संवेदनशील क्षेत्रे अबाधित राहाणार आहेत.

  • काही महिन्यांपूर्वी नगरनियोजन मंत्री राणे यांनी कांदोळी, कळंगुट, वास्को, पणजी, कदंब पठार, म्हापसा, मडगाव, हडफडे-नागवा-पर्रा हे ओडीपी रद्द केले. त्‍यातील चुकांची दुरुस्ती करून टप्‍प्या-टप्‍प्याने खुले करण्यात येतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

KitKat Chocolate Theft: चोरट्यांना 'किटकॅट'ची चटक! 12 टन पळवले चॉकलेट, नेस्ले प्रवक्त्याच्या 'त्या' विधानाची होतेय चर्चा

PSL Controversy: चेंडूशी छेडछाड करताना कॅमेऱ्यात कैद झाला 'हा' खेळाडू; आता थेट हकालपट्टीची टांगती तलवार Watch Video

Goa Accident: थिवीमध्ये भीषण अपघात! कारनं दोन दुचाकींना उडवलं, एकाचा मृत्यू; चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप

US Iran War: "इराण गुडघ्यावर आलाय!" डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा; 15 कलमी शांतता योजनेवर लवकरच होणार स्वाक्षरी? VIDEO

VIDEO: बागा बीचवर मृत्यूशी थरार! पॅरासिलिंग सुरु असताना अचानक दोरी तुटली अन्... पाहा थरकाप उडवणारा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT