Goa IFFI 2022 |Goa News  Dainik Gomantak
गोवा

Goa IFFI 2022: मांडवीतिरी साज, पणजीत झगमगाट!

Latest Update IFFI 2022: देश-विदेशातील प्रतिनिधींमध्ये वाढली उत्कंठा

दैनिक गोमन्तक

Latest Update IFFI 2022: तीन दिवसांवर आलेल्या 53 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून यासाठी मांडवी तीरावरची राजधानी पणजीनगरी सजू लागली आहे. 20 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या या महोत्सवासाठी आतापर्यंत 5 हजार 600 प्रतिनिधींनी नावनोंदणी केली असून प्रतिनिधींचे कार्ड वितरणाचे काम आजपासून सुरू झाले.

हा महोत्सव जगभर पोहोचवण्यासाठी 515 माध्यम प्रतिनिधींनी नावनोंदणी केली आहे. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे (एनएफडीसी) आयोजनाचे हे पहिलेच वर्ष असले तरी अनेक गोष्टी निर्धारित वेळेपेक्षा अगोदर जाहीर केल्याने महोत्सव अधिक नियोजनबद्ध होईल, अशी चर्चा आहे.

दोन वर्षांच्या कोरोना कालखंडानंतर यंदा प्रथमच पूर्ण तयारीने इफ्फी होत असल्याने हा महोत्सव अधिक भव्य-दिव्य करण्यासाठी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाबरोबर राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ, गोवा सरकार आणि गोवा मनोरंजन सोसायटी अधिक सक्रिय झाली आहे. ‘एनएफडीसी’चे आयोजनाचे हे पहिलेच वर्ष आहे.

यंदा या महोत्सवात 79 देशांतील 280 पेक्षा जास्त चित्रपटांचे प्रदर्शन होत असून यातील अनेक चित्रपटांचा जागतिक प्रीमियर होत आहे. याशिवाय श्रद्धांजली, प्रादेशिक फोकस, विशेष प्रदर्शन, दादासाहेब फाळके पुरस्कारविजेत्या अभिनेत्रीचे चित्रपट, गोवा विभाग अशा अनेक भागांमध्ये चित्रपटांचे प्रदर्शन होईल.

याशिवाय ‘फिल्म बाजार’मध्ये अनेक उपक्रम राबवले जाणार असून प्रथमच राज्यभर चित्रपटांचे प्रदर्शन होत आहे.

सेलिब्रिटींचा मेळा

यंदा इफ्फी महोत्सवास बॉलीवूडमध्ये कार्यरत असलेले 220 पेक्षा जास्त सेलिब्रिटी उपस्थित राहातील, तर 118 आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी महोत्सवात सहभागी होऊन चारचांद लावणार आहेत.

उद्‌घाटन आणि समारोपात बदल

ऑस्ट्रियन दिग्दर्शक डायटर बर्नर यांचा ‘अल्मा आणि ऑस्कर’ या चित्रपटाने यंदाच्या महोत्सवाची सुरुवात होईल, तर क्रिसझटॉप झानुसी यांच्या ‘परफेक्ट नंबर’ या चित्रपटाने महोत्सवाची सांगता होणार आहे. यावेळी प्रथमच उदघाटन आणि समारोप समारंभापूर्वी या चित्रपटांचे प्रदर्शन होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PSL Controversy: चेंडूशी छेडछाड करताना कॅमेऱ्यात कैद झाला 'हा' खेळाडू; आता थेट हकालपट्टीची टांगती तलवार Watch Video

Goa Accident: थिवीमध्ये भीषण अपघात! कारनं दोन दुचाकींना उडवलं, एकाचा मृत्यू; चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप

US Iran War: "इराण गुडघ्यावर आलाय!" डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा; 15 कलमी शांतता योजनेवर लवकरच होणार स्वाक्षरी? VIDEO

VIDEO: बागा बीचवर मृत्यूशी थरार! पॅरासिलिंग सुरु असताना अचानक दोरी तुटली अन्... पाहा थरकाप उडवणारा व्हिडिओ

Mahika Sharma : हार्दिक पांड्याची गर्लफ्रेंड माहिकानं दाखवलं आईचं रुप! चिमुकल्या अगस्त्यसाठी गर्दीत बनली 'ढाल' Watch Video

SCROLL FOR NEXT