IFFI 2022 Madhyantara Short Film |Goa News  Dainik Gomantak
गोवा

Basti Dinesh Shenoy IFFI 2022: सेल्युलाईड कॅमेऱ्यामुळे एक मोठा काळ जगभरातील सिनेनिर्मितीने व्यापला

Basti Dinesh Shenoy IFFI 2022: ‘कोकणी सरदारा’ने साकारला ‘सेल्युलाईड’वर लघुपट ; आज प्रीमियर

दैनिक गोमन्तक

53rd IFFI 2022: सेल्युलाईड कॅमेऱ्यामुळे एक मोठा काळ जगभरातील सिनेनिर्मितीने व्यापला होता. पण आता अशी सिनेमा चित्रीकरणाची पद्धत लोप पावली आहे. अशावेळी लेखक-दिग्दर्शक बस्ती दिनेश शणै यांनी आपला पहिला-वहिला लघुपट ‘मध्यांतर’ मात्र आवर्जून सेल्युलाईड कॅमेऱ्यावर साकारला.

महत्त्वाची बाब म्हणजे, अशा पद्धतीने चित्रित केलेला हा पहिलाच लघुपट असून, यावर्षीच्या इंडियन पॅनोरमामध्ये तो निवडला आहे. रविवार, 27 रोजी आयनॉक्समध्ये या सिनेमाचा प्रीमियर होत आहे.

कोकणी सरदार म्हणून देशभर आणि कोकणी जगतामध्ये ओळख असलेले आणि मंगळुरूस्थित विश्व कोकणी अकादमीचे अध्वर्यु दिवंगत बस्ती वामन शणै यांचे सुपुत्र बस्ती दिनेश शणै हे मुळात सिनेमॅटोग्राफर आणि निर्मितीप्रमुख म्हणून दिल्लीमध्ये विविध माहितीपट, जाहिरातपटांसाठी काम करतात. कोविड काळामध्ये ‘युट्युब’वर काही व्हिडिओ पाहताना त्यांच्या मनात एका कथेने जन्म घेतला.

आपल्या बालपणीच्या काही आठवणींना त्यांनी कथारूपात मांडून त्याला थोडी कल्पनेची झालर दिली आणि कोविड ओसरल्यानंतर ती काही मित्रांना ऐकवली. ती मित्रांना खूपच आवडली. त्यामुळे त्यांनी त्यावर आपला पहिला-वहिला लघुपट ‘मध्यांतर’ दिग्दर्शित करायचे निश्चित केले.

दोन मित्रांच्या सिनेमावेडाची गोष्ट

‘मध्यांतर’ या लघुपटात दोन तरुण मित्रांच्या सिनेमावेडाची गोष्ट सांगितली आहे. 1970 च्या दशकात कर्नाटकात घडलेली ही गोष्ट असून, काळाचा तो अनुभव पडद्यावर येण्यासाठी रिळ सेल्युलाईडवर चित्रित करणे गरजेचे होते.

कारण त्यामुळेच या गोष्टीला सर्वांगाने परिपूर्णतः लाभणार होती. म्हणूनच आम्ही रिळ सेल्युलाईडचा अट्टहास धरला आणि तो फलदायी झाला, असे बस्ती शणै यांनी नमूद केले. या लघुपटाच्या यशानंतर पूर्ण लांबीचा सिनेमा सेल्युलाईडवर करणार असल्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

"दिल्लीमध्ये असलो तरी, माझे पूर्वायुष्य मंगळुरूतले आहे. त्यामुळे ‘मध्यांतर’ कन्नड भाषेमध्ये करायचे, असे ठरवले आणि या गोष्टीची नैसर्गिक गरज असल्यामुळेच मी हा लघुपट संपूर्णतः सेल्युलाईडवर चित्रित करायचे ठरवले. यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागला. पण त्या मेहनतीचे चीज झाले."

- बस्ती दिनेश शणै.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT