Girish Chodankar | Goa News  Dainik Gomantak
गोवा

Girish Chodankar: तूरडाळ, साखरेनंतर आता चार टन हरभऱ्याची नासाडी

Girish Chodankar: नागरी पुरवठा खात्याची लक्तरे वेशीवर : विल्हेवाटीसाठी निविदा

दैनिक गोमन्तक

Girish Chodankar: गरीब जनतेसाठी केंद्र सरकारच्या कोट्यातून मिळालेली तूरडाळ, साखर खराब केल्याचे प्रकरण चर्चेत असतानाच आता फोंडा येथील सरकारी गोदामातील चार टन हरभऱ्याची नासाडी केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.

यामुळे जीवनावश्यक वस्तूंची नासाडी करणाऱ्यांविरोधात गंभीर गुन्हे दाखल करून कठोर शिक्षा करावी, अशी मागणी होत आहे. याविरोधात सामान्य नागरिकांमधूनही तीव्र संतापाची लाट उसळली आहे. तसेच विरोधकांनीही सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

कोरोना महामारीच्या काळात सामान्य लोकांसाठी वितरित करण्याकरिता केंद्र सरकारच्या कोट्यातून आलेली कोट्यवधी रुपयांची 241 मेट्रिक टन तूरडाळ आणि 10.13 मेट्रिक टन साखर खराब झाल्याचे कारण देत त्याची विल्हेवाट लावण्यासाठी निविदा काढल्या होत्या.आता हरभराही खराब झाल्याची घटना समोर आल्याने त्याची विल्हेवाट लावण्यात येणार आहे.

"जीवनावश्यक वस्तूंची नासाडी, हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे आणि नागरी पुरवठा खात्याचे अधिकारी तो वारंवार करत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेच पाहिजेत. या प्रकरणाशी संबंधित मंत्र्यांनी राजीनामा द्यावा. शिवाय गरिबांच्या तोंडचा घास पळवणाऱ्या सरकारने खुर्ची सोडावी."

- गिरीश चोडणकर, माजी प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

‘मी पत्रकार असतो तर ...’ सरदेसाईंच्या मिश्किल प्रतिक्रियेमुळे राजकीय वर्तुळात चर्चा; Watch Video

Mohammed Siraj: 'मी बोल्ड करतो, तेंव्हाच सेलिब्रेशन करतो'! टीका करणाऱ्या इंग्लंडच्या चाहत्यांवर सिराजचा बाऊन्सर

Rainforest Challenge 2025: खडकाळ वाटा, पाणथळ रस्ता आणि 'रेनफॉरेस्ट चॅलेंज'चा थरार..

America Arms Supply: अमेरिकेने दिली पाकला शस्त्रे! भारताची आक्रमक भूमिका; 1971 ची बातमी केली Twit

Goa Assembly Live: रंगमंच कलाकार, उद्योजक परेश जोशी यांचे निधन

SCROLL FOR NEXT