Drug Case Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: एनसीबी अ‍ॅक्शन मोडमध्ये; गोव्यात येणारे 20 कोटींचे ड्रग्ज मुंबई विमानतळावर जप्त

Goa Crime News: मुंबईत कारवाई : दीड महिन्यातील एनसीबीने मुंबईत केलेल्या कारवाईतील हे तिसरे प्रकरण

दैनिक गोमन्तक

Goa Crime News: दक्षिण अमेरिकेतून गोवा व मुंबईसाठी आणलेले 20 कोटींचे 2.8 किलो कोकेन आज मुंबई विमानतळावर मुंबई एनसीबीकडून जप्त करण्यात आले. दोन विदेशी महिलांना या प्रकरणी अटक केली असून गेल्या दीड महिन्यातील एनसीबीने मुंबईत केलेल्या कारवाईतील हे तिसरे प्रकरण आहे. कोट्यवधीचा अमलीपदार्थ गोव्यात पाठवण्यात येत असल्याने येथील पोलिस यंत्रणाही अधिक सतर्क झाली आहे.

किनारपट्टी भागामध्ये रात्री होणाऱ्या अमलीपदार्थ व्यवहाराच्या उलाढालीमुळे संशयास्पद फिरणाऱ्या विदेशी नागरिकांवर तसेच काही हॉटेल्स व रेस्टॉरंट्सवर करडी नजर पोलिसांनी ठेवण्यास सुरवात केली आहे.

गोव्याला पुरवठा करण्यात येणाऱ्या या ड्रग्जमुळे गोवा पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. देशात मोठ्या प्रमाणात महागड्या अमलीपदार्थाला मागणी असल्याने परदेशातील ड्रग्ज माफिया काही विदेशी प्रवाशांमार्फत तो पाठवण्याचा प्रयत्न करत आहेत.

काही महिन्यांपूर्वी ‘एनसीबी’ने कोट्यवधींचा अंमलीपदार्थाचा साठा मुंबई विमानतळावर जप्त केला होता. ज्यांच्याकडून तो जप्त केला त्या प्रवासी महिलेने गोव्यातील एका विदेशी महिलेला दिला जाणार असल्याची माहिती उघड केल्यावर तिलाही गोव्यातून ताब्यात घेण्यात आले होते.

विदेशातील ड्रग्ज माफियांचे मुंबई व गोव्यात आलेल्या विदेशी दलालांशी नेटवर्क आहे. मागणीनुसार हा ड्रग्ज पाठवला जातो. गोव्यात किनारपट्टी भागातील हॉटेल्स व रेस्टॉरंटमध्ये महागड्या ड्रग्जला मागणी आहे.

त्यामुळे ड्रग्ज विक्रेत्यांची व दलालांची माहिती मिळवण्यासाठी साध्या वेशातील पोलिस तैनात केले आहेत. गोव्यात हा ड्रग्ज विमानाने, रेल्वेने किंवा बसने पोहचत आहे. विमानतळ, बसस्थानके तसेच रेल्वेस्थानकांवर विदेशी प्रवाशांची तपासणी केली जात आहे.

भाडेपट्टीवर ठेवण्यात आलेल्या घर व फ्लॅट मालकांना विदेशी पर्यटकांची माहिती जवळच्या पोलिस स्थानकात देण्याच्या सूचना वेळोवेळी केल्या आहेत. मात्र, त्यात निष्काळजीपणा केल्यास जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार दंडात्मक कारवाईसाठी कठोर पावले उचलली जातील, अशी माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली.

महिलांचा वापर

मुंबईत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने परदेशातून आलेल्या ड्रग्जचा छडा मुंबई विमानतळावर लावला आहे. एनसीबीने गेल्या 2 ऑक्टोबरला 2 कोटींचा, तर 6 ऑक्टोबरला 100 कोटींचा हेरॉइन ड्रग्ज जप्त केला होता.

दक्षिण अमेरिकेहून मुंबई व गोवा मार्केटसाठी आणलेले 20 कोटींचे 2.8 किलो कोकेन जप्त केले. मुंबई विमानतळावर एनसीबीने केलेली ही तिसरी कारवाई आहे. ड्रग्ज माफिया या ड्रग्जच्या वाहतुकीसाठी महिलांचा वापर करत असल्याचे गेल्या तीन प्रकरणांतून सिद्ध झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सीटवरुन झाला वाद, भावांनी ट्रेनमध्ये बॉम्बची अफवा पसरवली; अम्रपाली एक्सप्रेसमध्ये धावपळ, पोलिसांची उडाली तारांबळ

60 कोटींची टांगती तलवार, शिल्पा शेट्टीचं गोव्यात 'होम-हवन'! बास्टियनची पारंपरिक सुरुवात

डिसेंबर 1986, राजभाषा आंदोलनाने उग्र स्वरूप धारण केले, सासष्टीत जिलेटिन स्‍फोट होत होते, स्‍फोटक वातावरणात 'रवीं'नी मडगाव गाठले

Coconut Tree: पोर्तुगीज येण्याआधीपासून गोव्यात असलेला, 80 देशांत लागवड होणारा कल्पवृक्ष 'नारळ'

Diwali 2025: पणजीत कारीट खातेय भाव! दिवाळी खरेदीसाठी गर्दी वाढली; आकाशकंदील, पणत्यांना मागणी

SCROLL FOR NEXT