Environment News|Goa News  Dainik Gomantak
गोवा

Goa Environment News: ‘पाणी वाचवा-माती वाचवा’; आमदार प्रवीण आर्लेकर

Pravin Prabhakar Arlekar: रॅलीत कृषी खात्याचे अधिकारी आणि काही शेतकरी सहभागी होणार आहेत.

दैनिक गोमन्तक

Goa Environment News: कृषी संचालनालयाकडून ‘पाणी वाचवा-माती वाचवा’ मोहीम जागृतीसंदर्भात शनिवारी दि. 19 नोव्हेंबर रोजी मोटारसायकल रॅली आयोजित करण्यात आली आहे. या रॅलीत कृषी खात्याचे अधिकारी आणि काही शेतकरी सहभागी होणार असून तेरेखोल किल्ला ते काब दी राम किल्ला असा रॅलीचा प्रवास असेल.

पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर यांच्या हस्ते सकाळी 9 वाजता रॅलीचा शुभारंभ होणार असून साखळी येथे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि फोंड्यात कृषीमंत्री रवी नाईक रॅलीचे स्वागत करतील, अशी माहिती कृषी खात्याचे संचालक नेव्हिल आल्फोन्सो यांनी दिली.

आज अनेक शेतकरी रासायनिक खतांचा अतिवापर करीत आहेत. हे असेच सुरू राहिल्यास भविष्यात मातीतून काहीच उत्पन्न मिळणार नाही. तसेच जास्त प्रमाणात मातीत पाण्याचा वापर झाल्यास मातीवर परिणाम होऊ शकतो.

शिवाय पाणी वाया जाते. त्यासाठी पाणीही काळजीपूर्वक वापरण्याची आवश्‍कता आहे. पावसाचे पाणी साठवून ठेवले पाहिजे, असे आवाहन आल्फोन्सो यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT