CM Pramod Sawant | Goa News
CM Pramod Sawant | Goa News Dainik Gomantak
गोवा

Pramod Sawant: राजधानी पणजीत पत्रकार भवन उभारण्याचा संकल्प

दैनिक गोमन्तक

Pramod Sawant: राजधानीत पत्रकार भवन असणे गरजेचे असून येत्या चार वर्षांत त्याची उभारणी होईल, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली. ते माहिती व प्रसिद्धी खात्याद्वारे इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा सभागृहात आयोजित राष्ट्रीय पत्रकार दिन कार्यक्रमात बोलत होते.

या कार्यक्रमात ‘गोमन्तक’चे संपादक-संचालक राजू नायक यांना गोवा राज्य सर्वोत्कृष्ट संपादक पुरस्कार व छायाचित्रकार संदीप देसाई यांना सर्वोत्कृष्ट छायाचित्राचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळी माहिती खात्याचे सचिव सुभाष चंद्रा, कार्यकारी संचालक केदार नाईक, ‘गुज’चे अध्यक्ष राजतिलक नाईक उपस्थित होते. सावंत म्हणाले, आपण जे लिहिताय ते खरे असेल तर पत्रकारांनी कुणाच्याही दबावाला बळी पडण्‍याचे कारण नाही.

राज्याच्या तसेच राष्ट्रहितासाठी निर्भिडपणे लिहिणे गरजेचे आहे. सचिव सुभाष चंद्रा म्हणाले, लोकशाहीत पत्रकारिता महत्त्वाची आहे. स्वातंत्र्यानंतर पत्रकारितेचे जाळे वाढले. वृत्तपत्रे, इलेक्‍ट्रॉनिक व समाजमाध्यमे वाढली. मात्र, प्रत्येकाने आपली विश्‍वासार्हता टिकविणे गरजेचे आहे.

गोमन्तक’चे संपादक-संचालक राजू नायक यांच्या ‘राष्ट्रीय एकात्मता आणि सांप्रदायिक सौहार्द’ या विषयावर आधारित ‘विद्वेशकारण’ या स्तंभलेखासाठी, तर संदीप देसाई यांना ‘राखण मशागती’ची या छायाचित्राला सर्वोकृष्ट छायाचित्र पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

तसेच गणेश शेटकर, क्रिस्टीन माचादो, लौकिक शिलकर, कल्पेश गावस, मार्कुस मेरगुल्हाओ, विश्वनाथ नेने, रामनाथ पै रायकर आणि गौरी मळकर्णेकर यांना विविध गटांत पुरस्कार प्राप्त झाले.

सिरिल डिकुन्हा यांना ‘जीवन गौरव’

ज्येष्ठ पत्रकार सिरिल डिकुन्हा यांना पत्रकारितेतील योगदानाबद्दल ‘टी. बी. कुन्हा जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र देसाई, विठ्ठलदास हेगडे, अरविंद टेंगसे, पीटर डिसोझा यांनाही यावेळी गौरविण्यात आले.

सायबर गुन्ह्यांबाबत जागृती हवी :

सध्याचे युग हे सायबर गुन्ह्यांचे आहे. अनेक सुशिक्षित नागरिक यास बळी पडतात. सरकारी नोकरी देतो असे सांगून लाखो रुपये उकळले जात आहेत. सायबर गुन्ह्यांबाबत जागृती करण्यासाठी पत्रकारांनी योगदान द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Loksabha 2024: निकालापूर्वीच काँग्रेसने मानली हार; मुख्यमंत्री सावंत यांचा गौप्यस्फोट

Goa Today's Live News: मतदानाचा उच्चांक भाजपला घरी पाठविण्यासाठी!

Air India Express: एअर इंडिया एक्सप्रेसची गोव्याला येणारी फ्लाईट रद्द, दिल्ली विमानतळावर प्रवाशांचा गोंधळ Video

Delhi Excise Policy Case: केजरीवाल विरुद्ध आमच्याकडे पुरावे, राजकारणाशी आमचा संबंध नाही; ED

Externment Orders: पास्टर डॉम्निक डिसोझा आणि जुआन मास्करारेन्हसला दिलासा; तडीपारीचा आदेश रद्द

SCROLL FOR NEXT