Goa News Dainik Gomantak
गोवा

Goa News: चिंबल खाडीवरील पुलाच्या कामाला अखेर सुरुवात

Goa News: 52.33 कोटींची निविदा : कंत्राटदाराला 2 वर्षांची मुदत

दैनिक गोमन्तक

Goa News: मृत्यूचा सापळा बनलेल्या चिंबल येथील जंक्शनच्या ठिकाणी गेली कित्येक वर्षे प्रलंबित असलेल्या चिंबल खाडीवरील पुलाच्या कामाचा आदेश जारी केला असून त्याचे काम सुरू झाले आहे.

त्यासंदर्भातचा आदेश सार्वजनिक बांधकाम खात्याचे मुख्य अभियंता (राष्ट्रीय महामार्ग, रस्ता व पूल) डी. सी. गुप्ता यांनी काढला आहे. या कामासाठी 52.33 कोटी रुपये खर्च येणार असून हे काम पूर्ण करण्यासाठी दोन वर्षांची मुदत देण्यात आली आहे.

जंक्शनच्या ठिकाणी असलेल्या या पुलाच्या रखडलेल्या कामामुळे अनेक अपघात घडून मृत्यू झाले आहेत. कदंब पठारावरून मेरशी सर्कलकडे येताना या ठिकाणी मोठी उतरण असल्याने वाहतूक सिग्नलपर्यंत येताना वाहनावर नियंत्रण ठेवणे मुश्किलीचे होते.

त्यामुळे अवजड वाहनांचे अपघात सतत घडत असतात. आज सांताक्रुझचे आमदार रुडॉल्फ फर्नांडिस यांनी वाहतूक पोलिस व कंत्राटदार यांच्यासह या जंक्शनच्या ठिकाणी पाहणी केली व हे काम पूर्ण होईपर्यंत तोडगा काढण्याबाबत चर्चा केली.

चिंबल जंक्शनच्या ठिकाणी असलेल्या वाहतूक सिग्नलपासून सुमारे 50 मीटर अंतरावर आणखी एक सिग्नल उतरणीवर घालण्यात यावे. त्यामुळे भरधाव येणाऱ्या वाहनांच्या गतीवर नियंत्रण येऊ शकेल.

या ठिकाणी सेवा रस्ताही या कामाच्यावेळी उपलब्ध करण्याच्या सूचना आमदार रुडॉल्फ फर्नांडिस यांनी केल्या. उतरणीवरून पणजीकडे येणाऱ्या अवजड वाहनांचा ब्रेक लागत नाही. त्यामुळे हे जंक्शन मृत्यूचा सापळा बनले आहे.

यावर पर्याय म्हणजे चिंबल खाडीवरील पूल हाच आहे. त्यासाठी सरकारने गेल्या आठवड्यात निविदा काढली आहे व त्याचे कामही सुरू झाले आहे, असे त्यांनी सांगितले.

वाहनचालकांना त्रास होणार नाही

चिंबल खाडीवरील पुलाचे कंत्राट मिळालेल्या कंत्राटदाराने सांगितले की, चिंबल येथील सेवा रस्त्यासाठी कामाचा आदेश मिळालेला नाही. हा रस्ता तयार करण्यासाठी किमान दोन महिने लागतील, तर या खाडीवरील पुलाचा एकेरी भाग पूर्ण करण्यास किमान एक वर्ष लागेल.

चिंबल जंक्शनवर या कामावेळी कोणताही त्रास वाहनचालकांना होणार नाही याची सावधगिरी बाळगली जाईल. वाहतूक पोलिसांबरोबर बैठक घेऊन योग्य असा वाहतूक व्यवस्थापन आराखडा केला जाईल, असे त्यांनी सांगितले.

या पुलाच्या कामावेळी तेथील वाहतूक सिग्नल यंत्रणा सुरूच असेल. मात्र, तेथे आवश्‍यकतेनुसार वाहतूक पोलिसांचीही नेमणूक केली जाईल. जो वाहतूक व्यवस्थापन आराखडा सादर केला जाईल त्यानुसार या जंक्शनच्या ठिकाणी वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्‍यक ती पावले उचलण्यात येतील.

- ब्रँडन डिसोझा, वाहतूक पोलिस निरीक्षक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: मैदानात फटकेबाजी, गॅलरीत 'ब्लॅक मॅजिक'? चाहत्यानं लिंबू फिरवला अन् चेन्नईला पाजलं पाणी; ललित मोदीने विचारले गंभीर प्रश्न

Japan Earthquake: जपानमध्ये 7.5 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; उत्तर-पूर्वी किनारपट्टीवर त्सुनामीचा हाय-अलर्ट VIDEO

IPL 2026 Points Table: पंजाबचा 'पंजा' भारी! डबल हेडरनंतर गुणतालिकेत 'टॉपर'; मुंबई-चेन्नई अन् कोलकाताच्या गोटात चिंतेचं सावट

Israel Lebanon Map: युद्धविरामानंतर इस्रायलचा मोठा 'गेम'! नकाशाद्वारे लेबनॉनच्या भूभागावर वर्चस्व सिद्ध; हिजबुल्लासाठी धोक्याची घंटा

Vaibhav Suryavanshi Crying: टोपीने तोंड लपवले, डोळे पुसले पण हुंदका थांबेना! राजस्थानचा 'वंडर बॉय' ढसाढसा रडला; '16 सेकंदांचा' व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT