Goa News: मडकईतील रस्त्यांचे लवकरच डांबरीकरण - सुदिन ढवळीकर

Goa News: वाडी-तळावली परिसरात विविध विकासकामांचा शुभारंभ
Road Development Work | Goa News
Road Development Work | Goa News Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa News: मडकई मतदारसंघातील नागरिकांना चांगले ते देण्याचा आपला सातत्याने प्रयत्न असून मतदारसंघातील शिल्लक राहिलेली कामे नजीकच्या काळात पूर्ण करण्याबरोबरच मतदारसंघातील रस्त्यांच्या हॉटमिक्स डांबरीकरण कामाला येत्या डिसेंबर महिन्यात प्रारंभ करण्यात येईल, अशी माहिती वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिली.

वाडी - तळावली येथील लाडूबाय सातेरी मंदिराचे सुशोभीकरण व संरक्षक भिंतीच्या कामाचा शुभारंभ तसेच कवळे पंचायत क्षेत्रातील रस्त्यावरील पावसाच्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी केलेल्या कामाचा शुभारंभ केल्यानंतर वीजमंत्री सुदिन ढवळीकर बोलत होते. गेल्या रविवारी या कामाला शुभारंभ झाला.

वाडी - तळावली येथील कामाच्या शुभारंभाला जिल्हा पंचायत सदस्य गणपत नाईक, स्थानिक सरपंच वसुंधरा सावंत तसेच इतर पंचसदस्य उपस्थित होते. कवळे पंचायतीतील विकासकामाच्या शुभारंभाला माधवराव ढवळीकर ट्रस्टचे विश्‍वस्त मिथिल ढवळीकर, माजी सरपंच राजेश कवळेकर, विद्यमान सरपंच मनुजा नाईक, उपसरपंच सुशांत कपिलेश्‍वरकर तसेच इतर पंचसदस्यांसह मगोचे पदाधिकारी अनंत नाईक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सुदिन ढवळीकर पुढे म्हणाले, मडकई मतदारसंघात जे चांगले ते देण्याचा आपण सातत्याने प्रयत्न केला आहे, आणि यापुढेही राहणार आहे. मतदारसंघातील विकासकामे मध्यंतरीच्या काळात रखडली होती, पण ती आता मार्गी लागली असून नजीकच्या काळात ही विकासकामे पूर्ण करण्याबरोबरच इतर कामेही हाती घेण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

Road Development Work | Goa News
Ironman 70.3 Goa: रविवारी 'आयर्नमॅन'चा थरार; 70 गोवन ट्रायअ‍ॅथलीटस घेणार सहभाग

मडकई मतदारसंघातील कवळे, बांदोडा, दुर्भाट, दाग व मडकई तसेच इतर पंचायत क्षेत्रातील मुख्य रस्त्याचे हॉटमिक्स डांबरीकरण प्राधान्यक्रमाने हाती घेण्यात येत आहे. पावसामुळे हे काम रखडले होते, पण आता ते येत्या डिसेंबर महिन्यात सुरू करण्यात येत आहे.

रस्त्यांच्या कामाच्या निविदा काढण्यात आल्या असून पुढील सोपस्कारही पूर्ण झाले आहेत, त्यामुळे आता येत्या महिन्यात या कामाला सुरुवात झाल्यावर नागरिकांना चांगले रस्ते उपलब्ध होतील, असे त्यांनी सांगितले.

Road Development Work | Goa News
Goa festival: साखळीतील ‘वाळवंटी’ काठी भक्तांची दाटी!

मडकई मतदारसंघातील विकासकामे येत्या वर्षीच्या मार्च महिन्यापर्यंत पूर्ण करण्यावर भर देण्यात आला आहे, त्यासाठी नियोजनही करण्यात आले असल्याची त्यांनी माहिती दिली. यावेळी जिल्हा पंचायत सदस्य तसेच सरपंच व इतरांनीही विकासकामांच्या पूर्ततेमुळे समाधान व्यक्त करून वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघाचा विकास होत राहणार असे नमूद केले.

वाईटावर चांगल्याने मात!

आपण नेहमीच अनिष्ट प्रथांच्या विरोधात आहे. वाईटावर चांगल्याने मात करणे म्हणजेच दिवाळी आहे. या दिवाळीत नरकासुराचा उदो उदो करण्यापेक्षा ज्याने नरकासुराचा वध केला, त्या भगवान श्रीकृष्णाला प्रथम स्थान द्यायला हवे, असे मंत्री सुदिन ढवळीकर म्हणाले.

Road Development Work | Goa News
Goa Government Jobs : गोव्यात सरकारी नोकरभरतीत मोठे बदल; मुख्यमंत्र्यांची घोषणा

कृष्णविजयाचा महोत्सव साजरा करण्याची आज नित्तांत गरज असून अशाप्रकारचा जर कार्यक्रम दिवाळीत आखला तर आपण हजारोंच्या संख्येने अशा कार्यक्रमाला उपस्थित राहू अशी ग्वाहीही सुदिन ढवळीकर यांनी यावेळी दिली. अनिष्ट प्रथांना फाटा देताना चांगले ते स्वीकारण्याची तयारी आजच्या युवा पिढीने ठेवायला हवी. जनकल्याणासाठी युवा वर्गाने सक्रीय होण्याचीही गरज आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com