Chapora River |Goa News Dainik Gomantak
गोवा

Chapora River: आता शापोरा नदीतून होणार वाळूचा उपसा; लवकरच परवाने मिळणार

Sand Mining: मांडवी, झुआरीचे पर्यावरणीय अहवाल खुले

दैनिक गोमन्तक

Sand Mining: शापोरा नदीतून पारंपरिक पद्धतीने वाळू उपशासाठी पर्यावरणपत्रे प्राप्त झाल्याने वाळू उपशासाठीचे परवाने लवकरच दिले जातील. शिवाय मांडवी आणि झुआरी नद्यांचे पर्यावरणीय अहवाल नागरिकांसाठी खुले केले असून याबाबत सूचना आणि मत व्यक्त करावे, असे आवाहन खाण आणि भूगर्भशास्त्र खात्याचे संचालक डॉ. सुरेश शानभोग यांनी केले आहे.

शानभोग म्हणाले की, जैवविविधता मंडळाकडून शापोरा नदीचे पर्यावरण परवाने प्राप्त झाले असून अंतिम अधिसूचना काढल्यानंतर परवान्यासाठी अर्ज मागविणार आहोत. त्यामुळे लवकरच शापोरा नदीतील वाळू उपशासाठी परवाने मिळतील.

दुसरीकडे झुवारी आणि मांडवी या नद्यांसाठी राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेच्या वतीने केलेल्या विविध सर्वेक्षणाचे अहवाल खात्याला प्राप्त झाले आहेत. हे दोन्ही अहवाल खात्याच्या वेबसाईटवर असून लोकांकडून सूचना मागवल्या आहेत.

झुआरी : 84 लाख क्युबिक मीटर वाळू

राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेच्या शास्त्रज्ञांनी झुआरी नदीचे दोन प्रकारे सर्वेक्षण केले असून बोरी पूल, राशोल, शिरोडा, चांदोर, पंचवाडी, कुडचडे या पाच विभागांमध्ये 84 लाख 91 हजार 90 क्युबिक मीटर म्हणजेच 13 लाख 25 हजार 744 टन वाळू उपलब्ध आहे.

मांडवी : 5 लाख क्युबिक मीटर वाळू

एनआयओच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार मांडवी नदीत खांडेपार, कोठंबी, वळवई, नार्वे, पिळगाव, बेतकी, आमोणा अशा दहा भागांत 5 लाख 89 हजार 838 क्युबिक मीटर वाळू उपलब्ध असल्याचे म्हटले आहे. त्यानुसार जैवविविधता मंडळ, पर्यावरण खाते पुढील कार्यवाही करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT