Goa News Dainik Gomantak
गोवा

Goa News: 'समुद्री परिसंस्थेसाठी रांजा मासा महत्त्वाचा' - आदित्य काकोडकर

Aditya Kakodkar: संवर्धनाची गरज; डब्ल्यूडब्ल्यूएफ, सोनी इंडियाचा प्रकल्प

दैनिक गोमन्तक

Goa News: समृद्ध समुद्री पर्यावरणासाठी किनारपट्टीच्या भागात दिसणारा रांजा मासा (गिटारफिश) महत्त्वाची भूमिका बजावत असून या माशाच्या संवर्धनासाठी जागतिक वन्य निधी (डब्ल्यूडब्ल्यूएफ) आणि सोनी इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील मच्छीमारांच्या संयुक्त विद्यमाने प्रकल्प राबविण्यात येत आहे, अशी माहिती आदित्य नाईक काकोडकर यांनी दिली.

यावेळी सोनी इंडियाचे कार्पोरेट प्रमुख पूजा चौधरी, एचआर प्रमुख पुनीत रामपाल उपस्थित होते. सागरी परिसंस्थेत रांजा माशाचे महत्त्व व त्याच्या संवर्धनाची गरज मच्छीमार समाजास पटवणे हे या कार्यक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट होते.

राज्यातील किनारपट्टीवरील 17 ठिकाणी रांजा मासा दिसून येतो. हा समुद्री जैवविविधतेला मधला आणि महत्त्वाचा घटक आहे. कारण कोळंबी, खेकडे आणि छोट्या माशांवरती नियंत्रण ठेवण्याचे महत्त्वाचे काम तो करतो, तर व्हेलसारख्या मोठ्या माशांचे तो खाद्य आहे.

किनारपट्टी भागातील फिशरमन वगळता खूप कमी लोक हा मासा अन्न म्हणून वापरतात. मात्र, तो मोठ्या प्रमाणात मारला जातो. हे टाळण्यासाठी मासे पकडणाऱ्या कोळी समाजामध्ये जनजागृती करणे गरजेचे आहे, असे आदित्य नाईक काकोडकर म्हणाले.

रांजाचे अस्तित्व धोक्यात :

रांजा मासा शार्क (मोरी) व रे (पाकट) माशांच्या गटाशी संबंधित असून ते राज्याच्या किनारपट्टीवर आढळतात, पण त्यांच्या भौगोलिक वितरणाविषयी व जीवनचक्राविषयी खूपच कमी माहिती उपलब्ध आहे.

रांजा मासा किनारी सामाजिक-पर्यावरणीय परिसंस्थेचा महत्त्वाचा घटक आहे. रांजा माशाच्या बहुतांशी प्रजाती धोक्यात आल्याचे किंवा नष्टप्राय झाल्याची चिंता असल्याचे आदित्य नाईक काकोडकर म्हणाले.

"रांजा मासासारख्या धोक्यातील सागरी जीव वाचवण्यात आणि ते लुप्त होण्यापासून टाळण्यात त्याबरोबरच या माशाच्या (गिटारफिश) प्रजातीच्या संवर्धनात व एकंदरीतच मानवी समाजात सकारात्मक बदल घडवणे हेही आमचे ध्येय आहे."

- पुनीत रामपाल, एचआर प्रमुख, सोनी इंडिया

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच! अंपायरनं रनआऊट दिलं, तरीही फलंदाजानं सुरु ठेवली फलंदाजी; 'तो' निर्णय ठरला सामन्याचा टर्निंग पॉइंट Watch Video

VIDEO: बिहार बंददरम्यान विद्यार्थ्यांवर थेट 'एके-47' ने गोळीबार! पोलिसांचा अमानुष चेहरा कॅमेऱ्यात कैद; एसआयटी जवान डिस्मिस

America New Visa Policy: ऑनलाईन फ्रॉड अन् सेक्सटॉर्शन करणाऱ्यांना झटका! अमेरिकन नागरिकांना लुटणाऱ्या चिनी गँगवर निशाण्यावर; ट्रम्प सरकारची नवी व्हिसा पॉलिसी जाहीर

Weather Update: राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम! IMD कडून 31 जुलैपर्यंत 'यलो अलर्ट'; मुसळधार सरींचा अंदाज

CJP Protest Violence: 'सीजेपी' आंदोलनातील हिंसेमागे पाकिस्तान कनेक्शन! दंगल घडवण्यासाठी भामट्यांनी वापरले 'ब्लूटूथ ॲप्स'; पोलिस तपासात हायटेक नेटवर्क उघड

SCROLL FOR NEXT