'पूजा नाईकने केलेले आरोप... '! कॅश फॉर जॉब प्रकरणी DGP आलोक कुमारांनी दिली माहिती; हस्तक्षेप टाळण्याचे केले आवाहन Video

Goa DGP Alok Kumar: नागरिकांनी तपासात हस्तक्षेप करू नये, गोपनीय तपासाचे तपशील विचारू नयेत, असे स्पष्ट आवाहन गोवा पोलिस महासंचालक आलोक कुमार यांनी केले आहे.
Goa DGP Alok Kumar
Goa DGP Alok KumarDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्यात दुर्घटना किंवा गुन्हे झाल्यावर पोलिस त्याचा तपास आपल्या योग्य पद्धतीने करत असतात. यावेळी नागरिकांनी तपासात हस्तक्षेप करू नये, गोपनीय तपासाचे तपशील विचारू नयेत, असे स्पष्ट आवाहन गोवा पोलिस महासंचालक आलोक कुमार यांनी केले आहे. तपासाची माहिती सार्वजनिक झाल्यास संशयित सतर्क होतात आणि त्याचा तपासावर प्रतिकूल परिणाम होतो. लोकांची सुरक्षा हा आमचा सर्वोच्च प्राधान्यक्रम आहे, असेहि त्यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेत पोलिस महासंचालक आलोक कुमार यांनी स्पष्ट केले की, बायणा, वास्को येथे झालेल्या घरफोडी-दरोडा प्रकरणात एक संशयित पूर्वी पीडितेच्या दुकानात काम करत होता. त्या आतील माहितीचा गैरवापर करून हा दरोडा घालण्यात आला.

या प्रकरणात ६ जणांना ताब्यात घेण्यात आले असून सोन्यासह रोख रक्कम व गुन्ह्यात वापरलेले साहित्यही जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणात आणखी एक संशयित फरार असून त्यालाही लवकरच तुरुंगात टाकू. बायणा येथील चोरीचा छडा लावण्यासाठी गोवा पोलिसांनी या प्रकरणासाठी स्वतंत्र पथके तयार केली होती.

दरम्यान, म्हापसा दरोडा प्रकरणातही काही संशयितांना अटक केली आहे आणि काणकोणातील चोरीच्या प्रयत्नाचा छडाही लावण्यात येईल, असा विश्वास महासंचालकांनी व्यक्त केला. तसेच गुन्हे टाळण्यासाठी भाडेकरू पडताळणी आणि कामासाठी ठेवलेल्या कर्मचाऱ्यांची पोलिस पडताळणी करणे अत्यावश्यक असल्याचे देखील त्यांनी ठामपणे सांगितले.

Goa DGP Alok Kumar
Pooja Naik: 'पूजा नाईकच्या आरोपांना पुरावा मिळेना', DGP आलोक कुमार यांचा खुलासा; प्रकरणाचा तपास थंडावणार?

पूजा नाईकचे आरोप खोटे

पूजा नाईकची कॅश फॉर जॉब प्रकरणात चौकशी सुरू असून ती अंतिम टप्प्यात आहे. आतापर्यंत तिच्याकडून करण्यात आलेले आरोप सत्य ठरलेले नाहीत. चौकशी पूर्ण झाल्यानंतर आम्ही माध्यमांना संपूर्ण माहिती देऊ, असेदेखील आलोक कुमार यांनी स्पष्ट केले.

Goa DGP Alok Kumar
Saligao Murder Case: भाड्याच्या खोलीत दोघांचा खून, संशयित रेल्वेने पसार झाल्याची शक्यता; पोलिसांची पथके रवाना

ओळख पटली!

राज्याला हादरवून सोडणाऱ्या साळगाव दुहेरी हत्याकांडात संशयिताची ओळख पटली असून, या प्रकरणाबद्दल स्वतंत्र अपडेट लवकरच देऊ, असे महासंचालक आलोक कुमार यांनी जाहीर केले. तपास संवेदनशील असल्याने तपशील सध्या उघड करण्यात आलेला नाही असेही अालोक कुमार यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com