Sanjay Patil  Dainik Gomantak
गोवा

Padma Awards 2024: पद्मश्री संजय अनंत पाटील, गोव्याचा 'वन-मॅन-आर्मी'

Padma Awards 2024: गोव्याच्या शेतकऱ्याची केंद्र सरकारने प्रथमच दखल घेतल्याने मला मनस्वी आनंद आहे- पाटील

Ganeshprasad Gogate

Padma Awards 2024: गोवा मुक्तीच्या वेळी राज्य शेतीप्रधान होते. राज्यातील 86 टक्के जनता उदरनिर्वाहासाठी शेतीवर पूर्णपणे अवलंबून होती. सध्या देशाच्या सरासरीच्या तुलनेत राज्यातील शेतकऱ्यांचे प्रमाण बरेच कमी होत आहे.

त्यातही पूर्णपणे शेती- बागायतीवर अवलंबून असणाऱ्यांचे प्रमाण आणखी कमी होतेय. यावरुन सहजपणें लक्षात येते, की नवीन पिढी झपाट्याने कृषी क्षेत्रापासून दूर जात आहे.

अशा परिस्थितीत तरुणांना शेती- बागायतीचे आशादायी चित्र दाखवणाऱ्या अवलियाला केंद्र सरकारकडून पद्मश्री पुरस्कार झाला आणि त्याची नव्याने ओळख राज्यासहित देशालाही झाली.

कुळागार म्हणजेच बागायती सांभाळताना स्वतःच्या हाताने डोंगर पोखरून बागायतीसाठी पाणी उपलब्ध करून घेणारे व अनेक बागायतदारांना देखील तसेच घरांसाठी पाणी उपलब्ध करून देणारे गोव्याचे प्रगतीशील शेतकरी संजय अनंत पाटील या 'आधुनिक भगीरथा'विषयी थोडक्यात पण महत्वाचे असे...

पद्मश्री पुरस्काराची घोषणा करण्यात आल्यानंतर संजय पाटील यांनी त्यांची पहिली प्रतिक्रिया गोमंतकला दिली. ते म्हणाले ''गोव्याच्या शेतकऱ्याची केंद्र सरकारने प्रथमच दखल घेतल्याने मला मनस्वी आनंद आहे.

हा पुरस्कार गोव्यातील शेतकऱ्यांचे एक प्रतीक ठरणार आणि त्यातून अनेक शेतकऱ्यांना तथा बागायतदारांना ऊर्जा प्राप्त होईल. आपण अत्यंत समाधानी एवढ्यासाठीच आहे की, केंद्र सरकारने माझ्या या बागायतीच्या कार्याची दखल घेतली म्हणजेच शेती हा व्यवसाय खरोखरच चांगला आहे.''

‘वन-मॅन-आर्मी’:-

संजय पाटील यांना ‘वन-मॅन-आर्मी’ म्हणून ओळखले जाते. त्यांनी एकट्याने दहा एकर जमिनीच्या ओसा-ड भूखंडाचे भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या तांत्रिक मार्गदर्शनाने हिरव्यागार नैसर्गिक कुळागारात रूपांतर केले.

यासोबतच त्यांनी झाडांसाठी आवश्यक त्या पाण्याचे व्यवस्थापन करताना तरुणांसाठी एक आदर्श घालून दिला की, परिस्थिती कधीच अनुकूल नसते आपल्याला आवश्यक परिणाम हवा असेल तर अपार मेहनत घ्यावीच लागते.

संजय पाटील यांना बागायतीसाठी पाण्याची कमतरता कायम भासायची. मात्र त्या समस्येवर मात करण्यासाठी त्यांनी बागायती (कुळागर) लगतच्या डोंगरावर असलेला पाण्याचा स्रोत शोधून काढत कुळागारात मोठमोठे बोगदे मारून पाणी बागायती पर्यंत आणण्याचे ठरवले.

जीवामृताचा उपयोग:-

कुळागर जीवंत ठेवण्यासाठी बोगदे मारत पाणी बागायतीपर्यंत आणण्याचे त्यांचे कौशल्य आणि मेहनत ही राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक आहे. बोगदे मारणे हे खूप कठीण आणि जीवावर बेतणारे काम होते.

पण कुळागर वाचविण्यासाठी ते करण्यावाचून दुसरा पर्याय नव्हता. कित्येक महिने सतत खणून हे बोगदे मारण्यात आले व शेवटी पाणी बागायती पर्यंत पोहोचवण्यात त्यांना यश आले. केळी, सुपारी, नारळ, जायफळ, काळी मिरी, काजू, अननस या सारख्या झाडांची लागवड करताना या झाडांच्या जोपासनेबरोबरच झाडांच्या वाढीसाठी त्यांनी जीवामृताचा उपयोग केला.

देशी गाईचे शेण, गोमूत्र, बेसन पीठ, गूळ आणि वडाच्या झाडाखालची माती असे पाच पदार्थ मिळवून त्यांनी जीवामृत या पोषक द्रव्याचा बागायतीसाठी उपयोग केला.

याचा परिणाम म्हणजे झाडांची फळधारणा होण्याच्या काळात खूप सकारात्मक बदल झाल्याचे पाटील सांगतात. पाटील यांच्या प्रयत्नांमुळे अन्य शेतकऱ्यां-नाही नैसर्गिक शेतीसाठी प्रोत्साहन मिळाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

Disneyland In India: भारतात होणार ‘डिस्नेलँड’, 500 एकर परिसरातल्या थीम पार्कला ‘या’ राज्याने दिली मंजुरी

Crocodiles Viral Video: हा कसला वेडेपणा! चक्क मगरीला दुचाकीवर घेऊन प्रवास, व्हिडिओ पाहून म्हणाल, खतरनाक...

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Goa News Live Updates: पर्ये सुरी हल्ला प्रकरण; आरोपीला ५ दिवसांची पोलिस कोठडी

SCROLL FOR NEXT