Arjun Tendulkar visit Bodgeshwar Jatra 2024 at mapusa:
गोमंतकियांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री देव बोडगेश्वराची जत्रा सध्या सुरू आहे. म्हापशामध्ये बोडगेश्वराच्या जत्रोत्सवाला यंदा 23 जानेवारीपासून प्रारंभ झाला आहे. या जत्रोत्सवात मोठ्या संख्येने भाविक सहभागी होत आहेत. अशातच क्रिकेटर अर्जुन तेंडुलकरनेही म्हापशात श्री देव बोडगेश्वरांचे दर्शन घेतले आहे.
मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर गेल्या दोन क्रिकेट हंगामापासून देशांतर्गत क्रिकेट गोवा संघाकडून खेळत आहे. 24 वर्षीय अर्जुनने गोव्यासाठी चांगली कामगिरी केली आहे.
सध्या अर्जुन गोव्याच्या रणजी संघात आहे. त्याचमुळे तो संघासह गोव्यात आहे. यादरम्यान त्याने देव बोडगेश्वराच्या जत्रोत्सवाला भेट दिली. त्याने देवदर्शन केल्यानंतरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
सध्या रणजी ट्रॉफी 2023-24 स्पर्धेत 26 जानेवारीपासून सुरु झालेल्या गोव्याच्या तिसऱ्या सामन्यात अर्जुन खेळत आहे. गोव्याचा हा सामना पर्वरीत पंजाब विरुद्ध सुरू आहे.
अर्जुनने यंदाच्या रणजी ट्रॉफीमध्ये गोव्याच्या पहिल्या सामन्यात चंदीगढ विरुद्ध 70 धावांची खेळी केली होती, तसेच 1 विकेटही घेतली. सोबतच त्याने कर्नाटकविरुद्ध पहिल्या डावात 52 धावांची खेळी केली होती, तर दुसऱ्या डावात मात्र तो 6 धावांवरच बाद झाला.
अर्जुनने आत्तापर्यंत गोव्याकडून खेळताना 10 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 15 विकेट्स घेतल्या आहेत आणि एक शतक व दोन अर्धशतकांसह 372 धावा केल्या आहेत.
अर्जुन अष्टपैलू खेळाडू असून डाव्या हाताने फलंदाजी आणि डाव्या हाताने वेगवान गोलंदाजी करतो. तो फलंदाजीत खालच्या फळीत खेळतो.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.