पिसुर्ले : पर्ये मतदार संघात (Parye Constituency) येणाऱ्या भिरोंडा पंचायत क्षेत्रात येणाऱ्या वांते येथिल श्री दुर्गा महीला मंडळ (Durga Mahila Mandal) व शिव शक्ती महीला मंडळाच्या (Shiv Shakti Mahila Mandal) सदस्यांना सरकारांच्या आत्मा उत्तर गोवा (North Goa) संस्थेच्या वतीने अळंबी उत्पादन करण्याच्या मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले, सदर शिबिराचा 40 महिलांना लाभ झाला.
वांते सत्तरी (Vante Sattari) येथे आयोजित केलेल्या शिबिरात तांत्रिक गट व्यवस्थापक पुनम महाले, साह्याक तांत्रिक व्यवस्थापक अनिरुद्ध गावठणकर (Aniruddha Gavthankar) रमेश गावकर (Ramesh Gavkar0 यांनी प्रशिक्षणार्थीं महीलाना अळंबी उत्पादन करण्या संबंधी सविस्तर माहिती दिली व त्यांना त्या संबंधिचे साहित्य देण्यात आले, सरकारने ग्रामीण भागातील महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी विविध योजना आखीत आहे, त्यामुळे येणाऱ्या काळात महीला स्वयंपूर्ण होण्यास फार मदत होणार आहे, असे उद्गार यावेळी भिरोंडा पंचायतीचे माजी सरपंच तथा विद्यमान पंच उदयसिंह राणे यांनी काढले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.