Mahadayi Water Dispute:  Dainik Gomantak
गोवा

Mahadayi Water Dispute: अमित शहांच्या वक्तव्यावर विरोधक आक्रमक; मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

विजय सरदेसाई, अमित पाटकर, युरी आलेमाव, अमित पालेकर आक्रमक

Rajat Sawant

Mahadayi Water Dispute: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बेळगाव येथे झालेल्या जाहीर सभेत म्हादई प्रश्नावर एक वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे गोव्यात खळबळ उडाली आहे. विरोधकही आक्रमक झाले आहेत.

गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई

शहा यांच्या या वक्तव्यावर गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी टिका केली असून या प्रकरणावरुन मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागितला आहे. ते म्हणाले, "भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वाने मी जे सांगत आलो ते सत्य उघडकीस आणले आहे."

"म्हादई कर्नाटकात वळवणे हा गोव्याचे मुख्यमंत्री आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा संयुक्त निर्णय होता. आपल्या खुर्चीच्या बदल्यात, त्यांनी गोवावासीयांच्या पिढ्यान् पिढ्या पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवल्या आहेत. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी तातडीने पायउतार व्हावे व राजीनामा द्यावा", असे आव्हान सरदेसाई यांनी दिले.

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव

भाजप सरकारने आमची जीवनदायीनी आई म्हादईची हत्या केली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारला एक सेकंदही सत्तेत राहण्याचा अधिकार नाही. म्हादईच्या हत्येसाठी त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी करत भाजपच्या या निर्णयाचा निषेध करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे असे आवाहन विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केले आहे.

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर

मुख्यमंत्री म्हादईसंदर्भात खोटे बोलत होते, हे गृहमंत्र्यांनी उघड केले आहे. कही शेतकऱ्यांची तहान नाही, तर भाजपची सत्तेची भूक आहे. भाजपनेच म्हादईचा खून केला आहे अशी टीका कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केली आहे.

आपचे अध्यक्ष अमित पालेकर

आमची आवय आमची म्हादई विकण्याआधी मुख्यमंत्र्यांनी निदान तिच्या मुलांचा, गोव्यातील लोकांचा तरी विचार करायला हवा होता. तडजोड!! कोणत्या किंमतीवर? मी म्हादईचे रक्षण करीन असे बोलण्याआधी शरमेने मान खाली घाला. तुमका किम्मत दिना सेंटर अशी टीका आपचे अध्यक्ष अमित पालेकर यांनी मुख्यमंत्र्यांवर केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT