Yuri Alemao Dainik Gomantak
गोवा

Yuri Alemao: तरुणांना प्रोत्साहन देण्यात कला, संस्कृती खातं अपयशी; युरी आलेमाव यांनी व्यक्त केली खंत

Goa Opposition Leader Yuri Alemao Criticizes Culture Department: राज्यातील तरुण आपली संस्कृती जपण्यात रस दाखवतात, असे सांगून विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी कला व संस्कृती खाते त्यांना प्रोत्साहन देण्यात अपयशी ठरल्याची खंत व्यक्त केली.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: राज्यातील तरुण आपली संस्कृती जपण्यात रस दाखवतात, असे सांगून विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी कला व संस्कृती खाते त्यांना प्रोत्साहन देण्यात अपयशी ठरल्याची खंत व्यक्त केली. वेळीपवाडा-बाळ्ळी येथे लक्ष्मीपूजनानिमित्त श्री गणेश मंदिरातर्फे आयोजित घुमट आरती स्पर्धेच्या सोहळ्यात आमदार युरी आलेमाव बोलत होते. यावेळी केपेचे आमदार एल्टन डिकोस्टा, माजी सरपंच राजेश फळदेसाई व समितीचे सदस्य उपस्थित होते.

‘तालवाद्य वाजवण्याची आणि आरती गाण्याची तरुणाईची ऊर्जा खरोखरच प्रेरणादायी आहे आणि या माध्यमातून आपली समृद्ध संस्कृती चांगल्या हातात आहे हे स्पष्ट आहे. ही सुंदर ऊर्जा एक अद्भुत वातावरण तयार करते, ज्यामुळे आपल्या परंपरा समृद्ध होत राहतील. मात्र, कला व संस्कृती खाते त्यांना वाद्ये पुरविण्यात अपयशी ठरत आहे, ही खेदाची बाब आहे,’ असे आलेमाव यांनी सांगितले.

सरकारने वाद्य आणि इतर लाभ मिळविण्याची प्रक्रिया सुरळीत करून योजना इच्छित कलाकार आणि गटांपर्यंत पोहोचाव्यात, ‘सरकारला खरोखरच आपली संस्कृती आणि परंपरा जपायची असेल, तर योजनांचा लाभ घेण्याबाबत कलाकारांकडून तक्रारी न येता, या योजना खऱ्या व्यक्ती आणि गटांपर्यंत पोहोचतील हे पाहिले पाहिजे,’ असे आलेमाव म्हणाले. आपले कलाकार सादरीकरणातून राज्याचे नाव कसे उंचावतात याची अनेक उदाहरणे आपल्याकडे आहेत. जेव्हा ते आम्हाला अभिमान प्राप्त करून देतात, तेव्हा त्यांना मदत करणे हे सरकारचे कर्तव्य आहे, असे ते म्हणाले. केपेचे आमदार एल्टन डिकोस्टा यांनी स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल गटांचे अभिनंदन केले.

एल्टन डिकोस्टा, आमदार केपे

स्पर्धांकडे केवळ विजयासाठी पाहू नये, तर त्यातून आत्मविश्वास मिळतो आणि भविष्यातील कार्यक्रमासाठी खूप काही शिकण्यास मिळते. त्यामुळे पराभूत झालेल्यांनी निराश होऊ नये, तर स्वत:च्या उभारणीसाठी या मंचाचा वापर करावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT