Goa Online Frauds Dainik Gomantak
गोवा

Goa Online Frauds: चोरी, ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ; तीन घटनांमध्ये 20 लाखांहून अधिक रकमेचा गंडा

Goa Online Frauds: मॉडेलिंगचे कॉन्ट्रेक्ट मिळवून देतो, असे आमिष दाखवून सोशल मीडियाचा वापर करत 13 लाख 98 हजार रुपयांचा गंडा घातल्याचेही समोर आलेय.

Ganeshprasad Gogate

Goa Online Frauds: गोव्यात रस्ते अपघातांसोबतच गुन्हेगारी आणि अफरातफरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. गेल्या दोन दिवसांत अपघाताच्या 6ते 7 घटना घडल्या असून आजच्या एका दिवसांत अफरातफरीच्या 3 घटना राजधानी पणजीसह लगतच्या भागात घडल्या आहेत.

मोपा विमानतळवरून तब्बल साडेपाच लाखापेक्षा जास्त किमतीचे भंगार साहित्य चोरुन नेणाऱ्या इसमाला मोपा पोलिसांनी पकडल्याचे समजतेय. समीर हालिमशाह असे त्या संशयिताचे नाव असून त्याच्या विरोधात मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणाने तक्रर नोंदवली होती.

तर राजधानी पणजीत चोरीची घटना घडली असून कॅसिनोसमोरुन वाटसरु पर्यटकाचा मोबाईल चोरी केल्याची घटना उघडकीस आलीय. चोरटे दुचाकीवरुन आले आणि तीस हजार किमतीचा मोबाईल हिसकावून घेऊन गेले. अद्याप या चोरीचा छडा लागला नाही.

म्हापसा नजीकच्या साळगांव येथे मॉडेलिंगचे कॉन्ट्रेक्ट मिळवून देतो, असे आमिष दाखवून सोशल मीडियाचा वापर करत अज्ञाताने साळगाव येथील एका तरुणीला तब्बल 13 लाख 98 हजार रुपयांचा गंडा घातल्याचेही समोर आलेय.

टेलिग्रामची लिंक पाठवत संबंधिताने तिला एक ग्रुप जॉईन करायला सांगून नंतर तिला पैशाचे बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करायला संगीतीतले.

आपल्या्ला मॉडेल क्षेत्रात काम करण्याची संधी मिळेल या हव्यासापोटी त्या तरुणीने जवळपास 14 लाख रुपये गुंतवले. या प्रकरणी महिलेने सायबर क्राईम विभागाकडे धाव घेत तक्रार नोंदवली.

सध्या अशा घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून नागरिकांनी online व्यवहार करताना सतर्कता बाळगण्याचे आवाहन पोलिस प्रशासनातर्फे करण्यात आलेय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

St Estevam: संतापजनक! आठवीत शिकणाऱ्या 10 मुलांना वळ उठेपर्यंत मारहाण, सांतइस्तेव येथील शिक्षिकेवर गुन्हा दाखल

Goa Politics: 'एसटींसोबत रक्‍ताचे नाते सांगणारे आले अन् गेले'; मुख्‍यमंत्री, सभापतींकडून गावडेंवर खोचक ‘बाण’

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

Rashi Bhavishya 04 July 2025: प्रवासाचे योग, सामाजिक मान मिळेल; महत्वाची व्यक्ती भेटेल

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT