Goa Online Frauds Dainik Gomantak
गोवा

Goa Online Frauds: ONGC मध्ये काम देण्‍याच्‍या बहाण्‍याने शेकडो युवकांना लाखाेंचा गंडा

Goa Online Frauds: नावेलीच्‍या युवतीकडून मडगाव पोलीस स्‍थानकात तक्रार : अन्‍य ठिकाणीही लोकांना चुना

Ganeshprasad Gogate

Goa Online Frauds: केंद्र सरकारचे महामंडळ असलेल्‍या ओएनजीसी महामंडळात नोकरी देण्‍याच्‍या बहाण्‍याने गोव्‍यातील शेकडो युवकांना ऑनलाईन प्रक्रियेद्वारे लाखोंचा गंडा घालण्‍यात आला असून या ऑनलाईन फ्रॉडची बळी ठरलेल्‍या नावेली येथील मॅकलीन डायस या युवतीने मडगाव पोलीस स्‍थानकावर तक्रार नोंदविली आहे.

मिळालेल्‍या माहितीप्रमाणे, दहा दिवसांपूर्वी वृत्तपत्रांतून जाहिरात देऊन ओएनजीसीमध्‍ये नोकर भरती सुरु होणार असून त्‍यासाठी इच्‍छुक असलेल्‍यांचे अर्ज मागविण्‍यात आले होते.

कित्‍येक युवकांनी त्‍यासाठी अर्ज केल्‍यानंतर सुरुवातीला ॲप्‍लीकेशन फॉर्म घेण्‍यासाठी त्‍यानंतर गणवेषासाठी आणि त्‍यानंतर प्रशिक्षण शिबिरासाठी अशी वेगवेगळी कारणे सांगून युवकांना ऑनलाईनद्वारे पैसे भरण्‍यास सांगण्‍यात आले.

कित्‍येक युवकांकडून अशाप्रकारे 30 हजार रुपयांपर्यंत रक्‍कम उकळण्‍यात आली असून किमान शंभर युवकांना तरी असा फटका बसला असल्याचा अंदाज सामाजिक कार्यकर्ते सावियो कुतिन्‍हो यांनी व्‍यक्‍त केला. नावेलीच्‍या ज्‍या युवतीने ही तक्रार दाखल केली आहे तिला स्‍वत: 12 हजार रुपयांचा गंडा बसला.

यासंंबंधी माहिती देताना कुतिन्‍हो म्‍हणाले, या युवतीकडून तीनवेळा वेगवेगळ्‍या कारणांस्‍तव पैसे घेण्‍यात आले. त्‍यानंतर त्‍या युवतीला शंका आल्‍याने तिने माझ्‍याशी संपर्क साधला.

दरम्यान ओएनजीसीकडे चौकशी केली असता या आस्‍थापनात कुठलीही नोकर भरती चालू नाही आणि त्‍यांना यापूर्वी असे कित्‍येक फोन आले आहेत अशी माहिती देण्‍यात आली.

ओएनजीसीच्‍या नांवे जर युवकांना फसविले जात आहे याची माहिती या आस्‍थापनाला मिळालेली असेल तर या आस्‍थापनाने वृत्तपत्रात खुलासा देऊन या युवकांना सतर्क का केले नाही असा सवाल कुतिन्‍हो यांनी केला. गोव्‍यातील युवकांनी या अशा फसवणुकीला बळी पडू नये असे आवाहनही त्‍यांनी यावेळी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT