Goa Online Fraud Dainik Gomantak
गोवा

Goa Online Fraud: कंपनीची डिलरशिपची आमिष दाखवून '13' लाखाचा गंडा

Goa Online Fraud: एका नामांकित कंपनीची डिलरशिप देण्याचे आमिष दाखवून 12.75 लाखांना गंडा घातला.

दैनिक गोमन्तक

Goa Online Fraud: एका नामांकित कंपनीची डिलरशिप देण्याचे आमिष दाखवून 12.75 लाखांना गंडा घातल्याप्रकरणी सांताक्रुझ येथील एका कंपनीने सायबर क्राईम पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.

आयटीसी कंपनीचा कर्मचारी असल्याची बनावट ओळख दाखवून संशयिताने तक्रारदाराला ऑनलाईन गंडा घातल्‍याचे पोलिसांनी सांगितले. मिळालेल्‍या माहितीनुसार, सांताक्रुझ येथील एका कंपनीला एका व्यक्तीने आपण आयटीसी कंपनीचा कर्मचारी असल्याचे सांगितले.

तसेच कंपनीला डिलरशिप मिळवून देतो पण त्यासाठी काही रक्कम आगाऊ ऑनलाईनद्वारे द्यावी असेही सांगितले. तक्रारदाराने त्याच्यावर विश्‍वास ठेवला व संशयित जशी रक्कम मागत होता, तशी ऑनलाईन त्‍याला दिली.

सुमारे 12.75 लाखांची रक्कम देऊनही डिलरशिप मिळत नसल्याने तक्रारदाराला संशय आला. त्याने आयटीसी कंपनीच्या संकेतस्थळावर जाऊन पाहणी केली असता तेथे या कंपनीने सावधानतेचा इशारा देताना ‘काही व्यक्ती कंपनीचे नाव तसेच ब्रँड वापरून बनवेगिरी करत आहेत’ असे नमूद केले होते. तक्रारदाराला फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्‍याने तक्रार दाखल केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa vs Oman: अभिनव, शिवेंद्र, कौशिक विजयाचे शिल्पकार; आंतरराष्ट्रीय खेळाडू असलेल्या ओमान संघावर 6 विकेट्सनी मात

14 राज्ये, 80 पेक्षा जास्त एफआयआर अन् 200 हून अधिकांना बेड्या! ISIच्या शहजाद भट्टी नेटवर्कचा पर्दाफाश; भारतीय सुरक्षा यंत्रणांची मोठी कारवाई

Margao Vegetable Vendors: महिला भाजी विक्रेत्यांना मडगावात जागा उपलब्ध करणार; दिगंबर कामत

Navpancham Yog 2026: आर्थिक भरभराट अन् नोकरीत प्रमोशन! 4 राशींसाठी 'नवपंचम योग' ठरणार जॅकपॉट; करिअरला मिळणार रॉकेटसारखी गती

Goa Rooftop Solar Scheme: छतावर सोलर लावा अन् मिळवा 2.20 लाखांपर्यंत अनुदान; गोव्यात नवी योजना लागू

SCROLL FOR NEXT