Goa: Online Education
Goa: Online Education Dainik Gomantak
गोवा

Goa: विद्यार्थ्यांना मोफत वायफाय, मोबाईल द्या

Uttam Gaokar

सासष्टी : गोव्यातील (Goa) बहुतांश ग्रामीण भागांमध्‍ये योग्य कनेक्टिव्हिटी मिळत नसून विद्यार्थ्यांना ऑनलाईनच्या (Online Education) माध्यमाने शिक्षण घेणे अशक्य बनलेले आहे. ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी ज्या साधनसुविधा लागतात त्याही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे उपलब्ध नाही. विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी सरकारने आदिवासी उपयोजना निधीतून योग्य कनेक्टिव्हिटी पुरवून मोफत वायफाय व मोबाईल द्यावा, अशी मागणी गाकुवेध संघटनेचे सरचिटणीस रूपेश वेळीप यांनी आज येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.

यावेळी गाकुवेध संघटनेचे उपाध्यक्ष उदय गावकर, पीटर व्हिएगस व जयराम वेळीप उपस्थित होते.

सरकार एकीकडे आत्मनिर्भर भारत व स्वयंपूर्ण गोवा घडविण्याची घोषणाबाजी करीत आहे. पण, दुसरीकडे विद्यार्थ्यांना मूलभूत गरजांपासून वंचित राहावे लागत आहे. काणकोण, सांगे, सावर्डे, सासष्टी, धारबांदोडा तालुक्यातील ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना ऑनलाईनच्या माध्यमाने शिक्षण घेण्यासाठी कनेक्टिव्हिटी मिळत नसल्यामुळे शिक्षण घेण्यास अडथळा निर्माण होत आहे. विद्यार्थी नेटवर्कच्या शोधात डोंगरावर जात असून, पावसाळ्यात छत्री घेऊन शिक्षण घ्यावे लागत आहे. ग्रामीण भागात वीजपुरवठा सुरळीत नसून ग्रामीण भागात राहणाऱ्या शिक्षकांनाही नेटवर्क मिळत नसल्यामुळे ऑनलाईन वर्ग घेणे शक्य होत नाही, असे रूपेश वेळीप यांनी सांगितले.

काणकोण व सांगे तालुका हा ग्रामीण भागात येतो. या भागातील लोक नेटवर्क कमी मिळत असल्यामुळे मोबाईलचा वापर फक्त संपर्क साधण्यासाठी करत आहेत. या भागातील कमी नेटवर्कमुळे शिक्षण घेणे विद्यार्थ्यांना अशक्य होत आहे. गोव्यात पूर्वी ज्याप्रकारे फक्त शहरात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेता येत होते, त्याचप्रकारची स्थिती पुन्हा निर्माण झाली आहे. शिक्षण घेणे हा प्रत्येक विद्यार्थ्याचा अधिकार आहे. त्‍यामुळे सरकारने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी त्वरित पावले उचलणे आवश्यक आहे, असे उदय गावकर यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धूमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT