आणखी एकाआरोपीचा पत्ता लागला असून लवकरच त्याला अटक होणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. Dainik Gomantak
गोवा

Goa: अमर नाईक यांच्या खुनप्रकरणातील एका आरोपीला लवकरच अटक होणार

शैलेश याने अमर नाईक यांच्या डोक्यात गोळी झाडून त्यांची हत्या करण्यात आली असल्याचे सिद्ध झाले आहे. देशी बनावटीची दोन पिस्तुले तसेच त्यातील आठ गोळ्या वास्को पोलिसांकडून (Vasco police) जप्त केल्या आहेत.

दैनिक गोमन्तक

अमर नाईक (Amar Naik) यांच्या खुनासाठी वापरण्यात आलेली देशी बनावटीची दोन पिस्तुले तसेच त्यातील आठ गोळ्या वास्को पोलिसांकडून (Vasco police) जप्त करण्यात आल्या. तसेच आणखी एकाआरोपीचा पत्ता लागला (One accused was found) असून लवकरच त्याला अटक होणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. शैलेश याने अमर नाईक यांच्या डोक्यात गोळी झाडून त्यांची हत्या करण्यात आली असल्याचे सिद्ध झाले आहे.

गुरुवारी बोगमाळो रंगवी इस्टेट येथे दिवसाढवळ्या डोक्यात पिस्तूलच्या गोळ्या झाडून नवे वाडे येथील अमर नाईक या युवकाचा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर या त्याविषयी अनेक तर्कवितर्क वर्तविण्यात आले होते. वास्को पोलिसांनी तसेच इतर पोलिसांकडून या हत्येचा बारा तासांच्या आत छडा लावून मुख्य आरोपींना गजाआड करण्यास मोलाची कामगिरी केली व नंतर पोलिसांनी हत्येप्रकरणी वेगवेगळे पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली. तसेच अमर नाईक याचा मित्र प्रितेश कुर्टीकर यांच्याकडून पुरावे गोळा करून आरोपी पर्यंत पोहोचण्यास महत्त्वाची कामगिरी केली.

दरम्यान, आरोपीकडून पोलीस वेगवेगळ्या प्रकारे माहिती गोळा करत हत्याप्रकरणी पुरावे गोळा करत आहे. आज वास्को पोलिसांनी घटनास्थळी जाऊन घटनास्थळापासून ३०० मीटर दूर एका झाडीत लपवून ठेवलेल्या दोन देशी बनावटीचे पिस्तूल जप्त केल्या. तसेच त्यातील आठ गोळ्या जप्त केल्या. दोन्ही आरोपीने सदर पिस्तूल बाळगल्या होत्या पैकी शैलेश याने अमर नाईक याच्या डोक्यात एक गोळी झाडली व त्याला ठार केले. तर दुसरी गोळी त्याने अमरचा मित्र प्रितेश कुट्टीकर याच्यावर झाली असता दैव बलवत्तर म्हणून प्रितेश याने प्रसंगावधान राखून त्याचा मारा चुकवला असता सदर गोळी अमरच्या गाडीच्या टपावर लागली होती. अन्यथा तोही हल्लेखोरांचा बळी बनला असता. नंतर त्याने पळून जाताना येथील दूरवर झाडीत सदर पिस्तुले लपवून पुढचा रस्ता धरुन ते जवळ कुठे लपून राहिले नंतर पहाटे साडेपाच वाजता तेव्हा पोलिसांच्या तावडीत सापडले.

उशिरा मिळालेल्या माहितीनुसार या हत्या प्रकरणात सामील असलेला व मुख्य आरोपींना भाडेपट्टीवर घेतलेला आरोपीला लवकरच होणार असल्याचे पोलिसांकडून माहिती मिळाली आहे. तसेच अंजुना येथून रवी शंकर यादव( ३० राघवपूर अझमघर, उत्तर प्रदेश) या तिसऱ्या आरोपीला अटक करण्यात आली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT