Goa: डिचोलीत अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी गुंता वाढला

आरोपानंतर सामाजिक संघटना गप्प ? पिडीत मुलीने एकच नाव उघड केल्याची माहिती समोर आली आहे. पिडीत अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्यानंतर हा संतापजनक प्रकार उघडकीस आला.
पिडीत मुलीवर आठपेक्षा अधिकजणांनी  बलात्कार केल्याचा आरोप झाला असतानाच, पिडीत मुलीने एकच  नाव उघड केल्याची माहिती समोर आली आहे.
पिडीत मुलीवर आठपेक्षा अधिकजणांनी बलात्कार केल्याचा आरोप झाला असतानाच, पिडीत मुलीने एकच नाव उघड केल्याची माहिती समोर आली आहे. Dainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: बारा दिवसांपूर्वी चर्चेत आलेल्या आणि सर्वत्र खळबळ माजवून दिलेल्या डिचोलीतील (Bicholim) अल्पवयीन मुलीवरील (girl) बलात्कार (Rape) प्रकरणी वेगळीच माहिती समोर आल्याने, या प्रकरणी आक्रमक भूमिका घेतलेल्या सामाजिक संघटनांनी आता काढता पाय घेतल्याचे समजते. पिडीत मुलीवर आठपेक्षा अधिकजणांनी बलात्कार केल्याचा आरोप झाला असतानाच, पिडीत मुलीने एकच नाव उघड केल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे या प्रकरणी सध्या गुंता निर्माण झाला आहे.

अशी फुटली प्रकरणाला वाचा

पिडीत अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्यानंतर हा संतापजनक प्रकार उघडकीस आला. त्यानंतर मागील 24 जून रोजी डिचोली पोलिसांनी गुन्हा नोंद करून दुसऱ्याच दिवशी डिचोलीत वास्तव्य करून राहणाऱ्या राज्याबाहेरील अरमान खान नामक संशयित युवकाला ताब्यात घेवून अटक केली. त्यानंतर मागील 4 जुलै रोजी गोमंतक परशुराम सेनेचे अध्यक्ष शैलेंद्र वेलिंगकर यांनी डिचोलीत येऊन पिडीत मुलीवर एक नव्हे, तर आठहून अधिकजणांनी बलात्कार केल्याचा आरोप केला. तसा व्हिडिओही व्हायरल झाल्यानंतर डिचोलीत एकच खळबळ माजली. श्री. वेलिंगकर यांनी केलेल्या आवाहनाला अनुसरून दुसऱ्याच दिवशी गोमंतक परशुराम सेनेसह राष्ट्रीय हिंदू महासभा, राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसेना आदी विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी डिचोली पोलिस ठाण्यावर धडक देवून, या प्रकरणी सखोल चौकशी करावी. अशी मागणी केली होती. या बलात्कार प्रकरणी अन्य काही संशयितांची नावेही दिली होती. गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न झाल्यास गप्प बसणार नाही. असा इशाराही श्री. वेलिंगकर यांच्यासह किशोर राव, ऐश्वर्या साळगावकर आदीनी दिला होता. यामुळे हे प्रकरण संवेदनशील बनले. त्यानंतर डिचोलीत या घटनेबद्दल संताप व्यक्त होतानाच वेगवेगळे मतप्रवाह पुढे येऊ लागले. या प्रकरणाकडे डिचोलीवासियांचे लक्ष लागून राहिले.

पिडीत मुलीवर आठपेक्षा अधिकजणांनी  बलात्कार केल्याचा आरोप झाला असतानाच, पिडीत मुलीने एकच  नाव उघड केल्याची माहिती समोर आली आहे.
Goa Politics : महिला कॉंग्रेसला पुन्हा सत्तेत आणणार

प्रकरणाची हवाच गेली

पिडीत मुलीवर अन्य काही जणांनी बलात्कार केल्याचा आरोप झाल्यानंतर पोलिसांनी ज्या संशयितांची नावे दिली होती, त्या संशयितांची चौकशी सूरू केली होती. मात्र त्यानंतर पिडीत मुलीची न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर जबानी घेण्यात आली, त्यावेळी पिडीत मुलीने अटकेत असलेल्या संशयित युवकाचेच नाव उघड केले. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासाची गती मंदावली. या प्रकरणी खळबळ माजवून देणाऱ्या सामाजिक संघटनांनीही आता गप्प राहिल्या आहेत. या प्रकरणी आवाज करणाऱ्या शहरातील एका माजी नगरसेवकाशी संपर्क साधला असता, त्यांनी अधिक बोलण्याचे टाळले.

दरम्यान, पिडीत मुलीला देखरेखीखाली उत्तर गोव्यातील एका सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com