Goa One accidental death every 27 hours  Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: राज्यात दर 27 तासांनंतर एक अपघाती मृत्यू; रस्ते सुरक्षा संस्कृती रुजवणे काळाची गरज

Goa Accident: ज्यावेळी एखाद्या व्यक्तीचा अपघात होतो त्यावेळी ती व्यक्ती आपला जीव गमावतेच; परंतु एक कर्ती व्यक्ती गेल्याने सारे कुटुंब उद्ध्वस्त होते.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Accident: ज्यावेळी एखाद्या व्यक्तीचा अपघात होतो त्यावेळी ती व्यक्ती आपला जीव गमावतेच; परंतु एक कर्ती व्यक्ती गेल्याने सारे कुटुंब उद्ध्वस्त होते. मागील दोन वर्षांपासून अपघाताच्या संदर्भात राज्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दर २७ तासांनंतर अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू होत असल्याचे निवृत्त पोलिस अधीक्षक महेश गावकर यांनी सांगितले.

‘गोमन्तक टिव्ही’वरील ‘गोमन्तक’चे संपादक-संचालक राजू नायक यांच्या ‘सडेतोड नायक’ या कार्यक्रमात गावकर बोलत होते. यावेळी दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाचे फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ. मधु घोडकिरेकर आणि ‘जेसीआय’चे उपाध्यक्ष अमोल वाणी यांनी कार्यक्रमात सहभाग घेतला होता. दरम्यान, गावकर म्हणाले की, सरकार आणि पोलिस (Police) वाहतूक नियमांचे पालन करण्यास सांगतात ते आपल्या भल्यासाठीच आहे, हे नागरिकांनी समजून घेणे गरजेचे आहे. अनेकांना आश्‍चर्य वाटेल; परंतु राज्यात घडणाऱ्या अपघातांपैकी दोन तृतीयांश अपघात हे ग्रामीण भागात घडतात.

तर तासाला एक अपघाती मृत्यू होईल!

राज्यात एका कुटुंबात जेवढ्या व्यक्ती आहेत त्यापेक्षा वाहने अधिक आहेत. राज्यात मोठ्या प्रमाणात अपघातांत वाढ होत आहेत. २००० साली सरासरी तीन दिवसांना एका व्यक्तीचा रस्ता अपघातात मृत्यू व्हायचा. नंतर दोन दिवसांना एक आणि आता दिवसाला एक मृत्यू होत आहे. आम्ही आताच जर पुढील पन्नास वर्षांचा विचार करून योग्य पावले उचलली नाहीत तर येत्या काही वर्षांत तासाला एक अपघाती मृत्यू होईल. राज्यात रस्ता सुरक्षा संस्कृती रुजविणे काळाची गरज असल्याचे डॉ. मधु घोडकिरेकर यांनी सांगितले.

सरळ रस्त्यांवर अधिक अपघात!

अनेक युवक आपण कोणती गाडी आणि किती वेगात चालवितो हे इतरांना दाखविण्यासाठी हेल्मेटचा वापर करत नाहीत. वाढता वेग आणि हेल्मेट न वापरणे ही अपघाताची प्रमुख कारणे आहेत. सर्वाधिक अपघात हे चांगल्या सरळ रस्त्यांवर होतात. राज्यात वाहतुकीसंबंधी कार्यरत असणारा एकही वरिष्ठ अधिकारी समोर येऊन अपघात (Accident) रोखण्याच्या अनुषंगाने आपण काय करू ईच्छितो, नागरिकांकडून आपल्याला कोणत्या अपेक्षा आहेत हे सांगत नसल्याची खंत महेश गावकर यांनी व्यक्त केली.

युवकांना आयुष्याची किंमत कळलेली नाही!

युवकांचे मोठ्या प्रमाणात अपघात होण्याची अनेक कारणे आहेत मद्यपान करून वाहन चालविणे, अठरा वर्षांपूर्वी योग्यप्रकारे वाहन हाताळता न येता ते चालविणे या प्रकारांमुळे मोठ्या प्रमाणात अपघात होतात. आम्ही महाविद्यालय, विद्यालयांमध्ये जाऊन यासंदर्भात जागृती करतो; परंतु अजून युवकांना आपल्या आयुष्याची किंमत कळलेली नाही याची खंत वाटते, असे अमोल वाणी यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Middle East War: "इराण सोडण्याच्या घाईत जीव धोक्यात घालू नका!" भारतीय दूतावासाकडून नवी नियमावली जारी; सीमा ओलांडण्यावर कडक बंदी

VIDEO: धुरंधरमध्ये 'पाकिस्तानी गाणं'! सिंगर हसननं केला मोठा खुलासा; निर्मात्यांनी 55 लाख दिल्याचा केला दावा

PAK vs BAN: "...मग आता ट्रॉफी चोरुन आणणार का?" PCB प्रमुखांच्या 'त्या' कृत्यावरुन अकमलनं उडवली खिल्ली; बांगलादेश मालिका गमावल्याचा काढला राग

Dhurandhar 2: बॉक्स ऑफिसचा नवा सुलतान! रिलीजआधीच 'धुरंधर 2' ची 119 कोटींची कमाई; 'जवान' अन् 'RRR' ला सोडले मागे VIDEO

Middle East War: मध्यपूर्वेतील युद्धाबाबत 'भ्रामक' पोस्ट करण पडलं महागात, युएईमध्ये 19 भारतीयांसह 35 जण जेरबंद; सुटकेची आशा धूसर

SCROLL FOR NEXT