Old Zuari Bridge Closure Dainik Gomantak
गोवा

Old Zuari Bridge Closure: प्रवाशांनो लक्ष द्या! शनिवारी जुना झुआरी पूल राहणार बंद, नियमित तपासणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचा निर्णय; पर्यायी मार्गाचा करा वापर

Goa Traffic Diversion NH66: राष्ट्रीय महामार्ग 66 वरील जुना झुआरी पूल शनिवार, 9 मे रोजी सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) घेतला.

Manish Jadhav

पणजी: गोव्यातील महत्त्वाच्या झुआरी पुलावरुन प्रवास करणाऱ्या प्रवासांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली. राष्ट्रीय महामार्ग 66 वरील जुना झुआरी पूल शनिवार, 9 मे रोजी सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) घेतला. पुलाची नियमित तपासणी आणि डेक लेव्हल रेकॉर्डिंगच्या कामासाठी हा पूल तात्पुरता बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती अधिकृत अधिसूचनेद्वारे देण्यात आली.

फातोर्डा येथील कार्यकारी अभियंता कार्यालयाने (राष्ट्रीय महामार्ग विभाग 14) जारी केलेल्या पत्रकानुसार, 9 मे रोजी सकाळी 6:00 ते 8:00 या दोन तासांच्या कालावधीत पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद असेल. या दोन तासांच्या काळात पुलावरुन कोणत्याही प्रकारच्या वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. पुलाची ही तांत्रिक तपासणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता (ब्रिज विभाग) यांच्या देखरेखीखाली केली जाणार आहे.

प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने पर्यायी मार्गाची व्यवस्था केली आहे. जुना पूल बंद असेपर्यंत सर्व वाहतूक शेजारीच असलेल्या नवीन आठ-लेन केबल-स्टेड झुआरी पुलावरुन वळवण्यात येईल. वाहतूक विस्कळीत होऊ नये आणि प्रवाशांच्या (Passengers) सुरक्षिततेसाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आवश्यक त्या ठिकाणी सूचना फलक आणि रस्ता सुरक्षा उपाययोजना करण्यात येणार आहेत. कार्यकारी अभियंता प्रितेश नाईक यांनी या संदर्भातील आदेश जारी केले असून प्रवाशांनी या बदलाची नोंद घेऊन आपल्या प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT