'एसओपी' पाळून ऑफलाईन वर्ग दैनिक गोमन्तक
गोवा

डिचोलीत 'एसओपी' पाळून ऑफलाईन वर्ग

नववीच्या वर्गांसाठी परीक्षेची अडचण

Dainik Gomantak

Goa: सोमवारपासून इयत्ता नववी आणि बारावीचे ऑफलाईन वर्ग (Offline Classes) सुरु होणार असले, तरी डिचोलीतील विशेष करून ग्रामीण भागातील शाळांनी प्रामुख्याने याआधीच दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन शिकवणी सुरु झाली आहे. त्यामुळे डिचोलीतील (Bicholim) शाळांमोर नववीचे ऑफलाईन वर्ग घेण्यासाठी विशेष अशी कोणतीही समस्या निर्माण होण्याची शक्यता कमीच आहे. तरीदेखील उद्यापासून काही शाळांनी परीक्षा (Schools Exams) होत असल्याने उद्यापासून नववीचे प्रत्यक्ष ऑफलाईन वर्ग घेणे कठीण होणार आहे.

श्री शांतादुर्गा विद्यालयात प्रतिसाद

कमी पटसंख्या असलेल्या ग्रामीण भागातील बहूतेक शाळांनी पालकांच्या सहमतीने ऑफलाईन वर्ग घेण्यात येत आहेत. काही शाळांमध्ये तर दहावीसह नववीचेही ऑफलाईन वर्ग घेण्यात येत आहेत. काही शाळांनी तर अधूनमधून पाचवी ते आठवी पर्यंतचे ऑफलाईन वर्ग घेण्यात येत आहेत. सर्वात ज्यास्त पटसंख्या असलेल्या शहरातील श्री शांतादुर्गा विद्यालयात गेल्या ता. 6 रोजीपासून इयत्ता दहावी आणि बारावीचे ऑफलाईन वर्ग सुरु करण्यात आले असून, आता नववी वर्ग सुरु करण्यात आले आहेत. आतापर्यंत या शाळेत सुरळीतपणे शिकवणी चालू असून, सरकारने नियुक्ती केलेल्या कोविड कृती दल समितीनेही व्यवस्थेबाबत समाधान व्यक्त केले आहे.

बारावीचे वर्ग सुरु

शहरातील शांतादुर्गासह विजयानंद आदी उच्च माध्यमिक विद्यालयातून आधीच बारावीचे ऑफलाईन वर्ग सुरु आहेत. शांतादुर्गा विद्यालयात तर अकरावीचे वर्ग सुरु करण्याची तयारी सुरु आहे. त्यामुळे उद्यापासून बारावीचे वर्ग सुरु करण्यासाठी या शाळांना कोणत्याही अडचणी येणार नाहीत.

मार्गदर्शक नियमांचे पालन

ऑफलाईन वर्ग सुरु करताना सर्व शाळांनी आवश्यक ती खबरदारी घेण्यात आलेली आहे. सॅनिटायझरचा वापर करूनच आणि तापमान तपासण्यात आल्यानंतर विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना मास्क परिधान करणे बंधनकारक आहे. एका बाकावर एकाच विद्यार्थ्याला बसाविण्यात येत आहे. वर्गांनी वेळोवेळी सॅनिटायझेशन करण्याची काळजी घेण्यात येत आहे. शाळेत मार्गदर्शक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात येत आहे. अशी माहिती विजयानंद संस्थेचे अध्यक्ष रुपेश ठाणेकर तसेच अन्य शाळांच्या व्यवस्थापनाकडून मिळाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT