Goa Number Plate Replacement Fees for Pre 2019 Vehicles Announced
पणजी: देशातील 2019 पूर्वीच्या वाहनांच्या नंबरप्लेट सुरक्षेच्या कारणास्तव बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गोव्यासह महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश आणि झारखंड या राज्यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता राज्यातील ज्या वाहनधारकांच्या वाहनांच्या नंबरप्लेट 2019 पूर्वीच्या आहेत त्यांना त्या बदलाव्या लागतील.
दरम्यान, नंबरप्लेट बदलण्यासाठी वाहनधारकांना पैसे मोजावे लागणार आहेत. नंबरप्लेट बदलण्याच्या माध्यमातून कोट्यवधींची लूट करण्याचा सरकारचा डाव असल्याचे बोलले जात आहे. दुचाकी, चारचाकी आणि अवजड वाहनांच्या नंबरप्लेटसाठी ठराविक रक्कम आकारण्यात येत आहे. इतर राज्यांच्या तुलनेत गोव्यात नंबरप्लेट बदलण्यासाठी कमी पैसे आकारले जात असले तरीही सरकारने ही लूट चालवल्याचा आरोप केला जात आहे.
दुचाकी नंबरप्लेटसाठी किती रक्कम?
गोव्यात (Goa) दुचाकीच्या नंबरप्लेटसाठी 155 रुपये आकारले जात आहेत. तर इतर राज्यांच्या विचार केल्यास महाराष्ट्रात 450 रुपये, गुजरातमध्ये 160 रुपये, आंध्र प्रदेशात 245 रुपये तर झारखंडमध्ये 300 रुपये आकारले जात आहेत.
चारचाकी नंबरप्लेटसाठी किती रक्कम?
तसेच, चारचाकी वाहनांच्या नंबरप्लेटसाठी गोव्यात 203 रुपये आकारले जात आहेत. तर महाराष्ट्रात 745 रुपये, गुजरात 460 रुपये, झारखंड, 540 रुपये तर आंध्र प्रदेशात 619 रुपये नंबरप्लेटसाठी आकारले जात आहेत.
अवजड वाहनांच्या नंबरप्लेटसाठी किती रक्कम?
याशिवाय, अवजड वाहनांच्या नंबरप्लेटसाठी गोव्यात 232 रुपये आकारले जात आहेत. तर महाराष्ट्रात 475 रुपये, गुजरातमध्ये 480 रुपये, झारखंड 570 रुपये तर आंध्र प्रदेशात 649 रुपये आकारले जात आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.