Pernem Beaches Dainik Gomantak
गोवा

Pernem Noise Pollution: पेडण्‍यातील शांत समुद्रकिनारे ध्‍वनिप्रदूषणामुळे ‘अशांत’! निर्बंधांना तिलांजली; संतप्त नागरिकांकडून सवाल उपस्थित

Pernem Beaches: आता शांत किनाऱ्यांना लागलेले ध्‍वनिप्रदूषणाचे ग्रहण कोण सोडवणार? असा संतप्‍त सवाल नागरिक उपस्‍थित करीत आहेत.

Manish Jadhav

मोरजी: पेडणे तालुक्यातील पर्यटनदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेले मोरजी आणि आश्‍‍वे-मांद्रे हे दोन समुद्रकिनारे कासव संवर्धन मोहिमेमुळे संवेदनशील तसेच ‘सायलंट झोन’ म्हणून सरकारने जाहीर केले. स्‍थानिकांनी सरकारच्‍या या निर्णयाविरोधात ‘ब्र’सुद्धा काढला नाही. परंतु आता शांत किनाऱ्यांना लागलेले ध्‍वनिप्रदूषणाचे ग्रहण कोण सोडवणार? असा संतप्‍त सवाल नागरिक उपस्‍थित करीत आहेत.

पर्यटकांची तोबा गर्दी

दरम्यान, पूर्वी या किनारी भागात नोव्हेंबर ते मे महिन्यापर्यंतच पर्यटक यायचे. परंतु आता काळ बदलला, नियम बदलले. त्यामुळे वर्षाचे 365 दिवसही पर्यटक वरील दोन किनाऱ्यांबरोबरच हरमल, केरी, तेरेखोल या किनारी भागातही मोठ्या संख्‍येने येतात.

काही विदेशी पर्यटक पर्यटनाच्या नावावर बेकायदेशीर व्यवसाय, उद्योगधंदेही करतात. मोरजी किनारी भागात वनखात्याने 1997 पासून कासव संवर्धन मोहीम राबवली जाते. ही मोहीम आजपर्यंत यशस्वीपणे राबवण्याची किमया वन खात्याने साधली आहे. त्‍यामुळे मोरजी, आश्‍‍वे-मांद्रे हे दोन संवेदनशील किनारे म्हणून ओळखले जातात.

समुद्रकिनारी भागात रात्री दहानंतर संगीत वाजवण्यास निर्बंध आहेत. परंतु पोलिस याबाबत अनभिज्ञ आहेत का, असा प्रश्‍‍न पडतो. पेडणे तालुक्यातील मोरजी, आश्‍‍वे-मांद्रे, हरमल या किनारी भागात ध्वनिप्रदूषण करणाऱ्यांवर पोलिसांनी आतापर्यंत काय कारवाई केली आहे, हा एक संशोधनाचा विषय आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया एका ग्रामस्थाने दिली.

तर दुसऱ्याने म्हटले की, पर्यटकांचे आकर्षण ठरतात ते समुद्रकिनारे. पण मागील काही वर्षांपासून समुद्र किनाऱ्यांवर होणाऱ्या पार्ट्या, कर्णकर्कश संगीत यामुळे हे शांत किनारे आता अशांत भासू लागले आहेत. स्थानिक लोकांची या आवाजाने झोपच उडाली आहे. त्यामुळे प्रशासनाने वेळीच करवाई करावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gram Panchayat CCTV Plan: गोव्यातील प्रत्येक पंचायतीवर सीसीटीव्हीची नजर! तीन आठवड्यांत प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता

Karnataka Accident: कर्नाटकात प्रवाशांवर काळाचा घाला! बस आणि ट्रक यांच्यात समोरासमोर धडक; 4 ठार, 14 जखमी

Land Compensation: जमीन मोबदल्यासाठी 7 वर्षांची प्रतीक्षा! 15 डिसेंबरपर्यंत निर्णय घ्या; गोवा खंडपीठाचे निर्देश

World Peace University: तंत्रज्ञानाने जग जवळ आले, पण मने दूरच! विश्वशांतीसाठी राज्यपालांचे महत्त्वाचे आवाहन; 'डब्ल्यूपीयू'च्या परिषदेचे थिवीत उद्‌घाटन

खरी कुजबुज: मंत्र्यांचा पाठिंबा नेमका कोणाला?

SCROLL FOR NEXT