Goa: After a successful surgery, Health Minister Vishwajit Rane picked up the baby Dainik Gomantak
गोवा

Goa: नऊ महिन्याच्या बाळाला मिळाला नवजन्म!

Goa: छिद्र पडलेल्या हृदयावर यशस्वी शस्त्रक्रिया; गोमेकॉच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

Yeshwant Patil

पणजी : बांबोळी (Bamboli - Goa) येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळाच्या (Goa Medical College Hospital) शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. हृदयाला छिद्र पडलेल्या एका गरीब कुटुंबातील (Poor family) ९ महिन्याच्या मुलीचे (Nine months child) प्राण वाचवण्यात गोमेकॉच्या डॉक्टरांना (GMC Doctor) यश (Success) आले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी, की दिवस पूर्ण होण्याअगोदर जन्माला आलेल्या एका ९ महिन्याच्या बाळाच्या हृदयाला छिद्र असल्याचे निदान झाले होते. या बाळाच्या मातापित्यांनी त्यास बांबोळी येथील गोमेकॉमध्ये दाखल केल्यानंतर गोमेकॉच्या हृदयविकार सर्जरी विभागाचे डॉ. मंजुनाथ देसाई, डॉ. मिशेल व्हिएगस परब व डॉ. अमर प्रभुदेसाई यांच्या पथकाने योग्य अभ्यास करून अत्यंत गुंतागुंतीची ही शक्रक्रिया हृदय न खोलता नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून यशस्वीरित्या पार पाडली व त्या चिमुकल्या जीवाचे प्राण वाचवले.

या बाळाला गोमेकॉत दाखल केल्यानंतर त्याच्या हृदयाला एक मोठे छिद्र असल्याचे निदान झाल्यानंतर ओपन हार्ट बायपास सर्जरी करणे शक्य नसल्याची जाणीव झाली. त्यामुळे या आजाराचा पूर्ण अभ्यास करून डिवाईसच्या माध्यमातून सर्जरी केली व ती यशस्वी झाली, असे डॉ. मिशेल व्हिएगस परब यांनी सांगितले. जन्मजात पीडीएचा आजार असलेल्या या मुलीवर गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. आम्ही तो प्रयत्न केला व त्यात यश आले. दुसऱ्याच दिवशी त्या बाळाला डिस्चार्ज दिला, असे डॉ. अमर प्रभुदेसाई यांनी सांगितले. गोमेकॉमध्ये आपल्या बाळाला उपचारासाठी आणले तेव्हा ते फार आजारी होते. त्याच्या छातीला छिद्र असल्याचे कळल्यानंतर आम्ही खचून गेलो होतो. मात्र, गोमेकॉच्या डॉक्टरांच्या पथकाने माझ्या बाळाला वाचवले, नवे जीवन दिले. आपण डॉ. मंजुनाथ, डॉ. मिशेल व डॉ. अमर तसेच गोमेकॉचे उपकार आयुष्यभर विसरणार नाही. मंत्री विश्वजित राणे यांनी माझ्या बाळाला उचलून घेतले. तो क्षण माझ्यासाठी उच्च क्षण होता, असे यावेळी भावनावश होऊन त्या मुलीच्या आईने सांगितले.

...आणि आईचे डोळे पानावले
९ महिन्याच्या चिमुकल्या बाळावर हृदय शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी डॉक्टरांचे आभार मानून अभिनंदन करतानाच या मुलीला उचलून घेऊन त्याला खेळवले. त्यावेळी या बाळाच्या आईचे डोळे पानावले होते.

खर्चीक शस्त्रक्रिया मोफत
या मुलीच्या हृदयातील पीडीए बुजवण्यासाठी गुंतागुतींची शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. त्यासाठी २ ते २.३० लाख रुपये खर्च होणार होता. मात्र, गोमेकॉमध्ये ही शस्त्रक्रिया मोफत करण्यात आली. एका गरीब कुटुंबाला गोमेकॉमुळे आनंद प्राप्त झाला असे म्हणता येईल.
- डॉ. शिवानंद बदेकर (डीन गोमेकॉ)

ही आमच्यासाठी समाधानाची बाब
गोमेकॉमध्ये बालरोगावर उपचार करण्यासाठी ‘१४९’ हा खास वार्ड विकसीत केला गेला आहे. त्यासाठी ४ कोटी रुपये खर्च केले होते. अशाप्रकारच्या जन्मजात हृदयरोगावर उपचार करण्याची सुविधा उपलब्ध केल्याचे समाधान वाटते. गोमेकॉच्या डॉक्टरांच्या पथकाच्या अथक प्रयत्नामुळे एका मातेला तिचे बाळ मिळाले. ही आमच्यासाठी समाधानाची बाब आहे. डॉक्टरांच्या पथकाचे विशेष अभिनंदन. या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे गोमेकॉ हे एक उत्कृष्ट इस्पितळ असल्याचे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे.
- विश्‍वजित राणे (आरोग्यमंत्री)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT