Michael Lobo Dainik Gomantak
गोवा

Goa Nightclub Fire: 'क्‍लबमधील अग्निसुरक्षा तपासा, मगच परवाने द्या'! मायकल लोबो; अधिवेशनात विधेयक मंजूर करण्‍याची मागणी

Michael Lobo: हडफडे येथील रोमियो लेन क्‍लबला आग लागली त्‍यावेळी तेथे नृत्‍य सुरू असल्‍याचे दिसून आले. राज्‍यात अशा पद्धतीचे ५० ते ६० क्‍लब सुरू आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

Michael Lobo Statement : राज्‍यात सध्‍या ५० ते ६० क्‍लब सुरू आहेत. परंतु, आगामी काळात अग्‍निसुरक्षेसंदर्भात क्‍लबनी केलेल्‍या उपाययोजनांची पाहणी करूनच त्‍यांना परवाने देण्‍यासंदर्भातील विधेयक विधानसभेच्‍या येत्‍या अधिवेशनात मंजूर होणे गरजेचे असल्‍याचे मत कळंगुटचे भाजप आमदार मायकल लोबो यांनी व्‍यक्त केले.

हडफडे येथील अग्नितांडवाचा जिल्‍हा पंचायत निवडणुकीवर काहीही परिणाम झाला नसल्‍याचेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले. राज्‍यात सध्‍या सुरू असलेल्‍या क्‍लबमध्‍ये बंदिस्‍त भागांत नृत्‍यांचे आयोजन केले जाते.

हडफडे येथील रोमियो लेन क्‍लबला आग लागली त्‍यावेळी तेथे नृत्‍य सुरू असल्‍याचे दिसून आले. राज्‍यात अशा पद्धतीचे ५० ते ६० क्‍लब सुरू आहेत. हडफडेतील घटनेनंतर पाच ते सहा क्‍लब बंद करण्‍यात आले आहेत.

परंतु, यापुढील काळात अशा क्‍लबना अग्निसुरक्षेसंदर्भातील पाहणी करूनच परवाने देण्‍याबाबतचे विधेयक सरकारने येत्‍या अधिवेशनात मंजूर करणे आवश्‍‍यक आहे, असे आमदार लोबो पत्रकारांशी बोलताना म्‍हणाले. हडफडे येथील आगीचा जिल्‍हा पंचायत निवडणुकीवर काहीही परिणाम झाला नाही.

‘त्‍या’ २५ जणांना न्‍याय हवा!

हडफडे येथील अग्नितांडवात ज्‍या २५ जणांना जीव गमावावा लागला त्‍यांना न्‍याय मिळणे अत्‍यंत महत्त्‍वाचे आहे. अशी मागणी आपण मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्‍याकडेही केली आहे. दंडाधिकाऱ्यांकडून अहवाल सादर झाल्‍यानंतरच या प्रकरणावर अधिक भाष्‍य करेन, असेही आमदार लोबो यांनी स्‍पष्‍ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT