Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: कामाठीपूर, बुधवार पेठेतील वेश्यांना गोव्यात आणलं जातंय; धक्कादायक अहवाल आला समोर

Goa Crime News: राज्यात २०१४ ते मार्च २०२४ दरम्यान वेश्याव्यवसायात ढकलण्यात आलेल्या ५६९ महिलांची या व्‍यवसायातून सुटका करण्‍यात आली. गोवा पोलीस आणि ‘अर्ज’ या ‘एनजीओ’ने ही कारवाई केली आहे.

Sameer Amunekar

मडगाव : मानव तस्‍करी पीडितांचे पुनर्वसन करण्‍यासाठी वावरणाऱ्या वास्‍को येथील ‘अर्ज’ या संघटनेने यासंबंधात एक अहवाल तयार केला आहे. राज्यात २०१४ ते मार्च २०२४ दरम्यान वेश्याव्यवसायात ढकलण्यात आलेल्या ५६९ महिलांची या व्‍यवसायातून सुटका करण्‍यात आली. गोवा पोलीस आणि ‘अर्ज’ या ‘एनजीओ’ने ही कारवाई केली आहे.

यासंबंधी माहिती देताना ‘अर्ज’चे निमंत्रक अरुण पांडे यांनी सांगितले की, ज्‍या पीडितांची सुटका केली गेली त्‍यातील बहुतेक पीडिता महाराष्‍ट्रातील खेडेगावातून तसेच भारतातील अन्‍य राज्‍यांतून मुंबईत रोजगारासाठी आल्‍या होत्या.

यातील बहुतेक पीडिता एक तर फिल्‍म लाईनमध्‍ये छोटी-मोठी कामे करायच्‍या तर काही ब्‍युटी पार्लर आणि मसाज पार्लरमध्‍ये कामाला होत्‍या. या कामात त्‍यांना तुंटपुंजा पगार मिळायचा. अशा महिलांना हेरून गोव्‍यात तुम्‍हाला चांगल्‍या पगाराची नोकरी मिळवून देतो, असे सांगून त्‍यांना फसवून गोव्‍यात आणले होते.

अन्याय रहित जिंदगी (अर्ज) या संस्थेच्या अहवालातून जी माहिती मिळाली आहे. त्‍यानुसार, गोवा हे महाराष्ट्राला लागून असल्याने पीडितांना गोव्यात आणणे सोपे होते. सुटका करण्यात आलेल्या बहुतेक पीडिता नोकरीसाठी अन्य राज्यातून महाराष्ट्रात स्थलांतरित झाल्या होत्या.

तर काही पीडिता महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून मुंबई, पुणे किंवा ठाण्यात आल्या होत्या. बहुतेक पीडिता मुंबई, ठाणे, पुणे, रायगड या भागात डान्स बार, मसाज पार्लर किंवा केटरींग इव्हेंटमध्ये काम करत होत्या. तर, काहीजणी चित्रपट इंडस्ट्रीमध्ये छोट्या स्वरूपाची कामे करत होत्या.

मुंबई येथील कामाठीपुरामध्ये देशातील सर्वात मोठी वेश्यावस्ती आहे. तर, पुण्यातील बुधवार पेठ येथे देशातील तिसऱ्या क्रमांकाची वेश्या वस्ती आहे. गोव्यात आणल्या जाणाऱ्या काही पीडिता या दोन वस्त्यांतून आणल्या जातात.

या दोन वस्त्यांतील ग्राहकांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे येथील वेश्यांना पुरेसे पैसे मिळत नाहीत. त्यांना तिथून गोव्यात आणले जात असल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे.

काही प्रकरणांत पीडितांनी आंतरधर्मीय विवाह केल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्यापासून सर्व संबंध तोडले होते. अशावेळी त्या पीडितेचा नवरा व्यसनाधीन निघाला किंवा तिला मारहाण करू लागला तर त्यांना पुन्हा घरी जाणे हा पर्याय नव्हता.

बहुतेक पीडितांचे शिक्षण इयत्ता आठवीपर्यंतच झाल्याने त्यांना नोकरीच्या संधी नव्हत्या. अशावेळी त्यांना फसवून वेश्याव्यवसायात ढकलले गेल्याचे अहवालात नमूद केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

October Heat: गोव्यात ‘ऑक्टोबर हिट’च्या झळा! पारा 34.5 अंशांवर; पुढील 3 दिवस मध्यम पावसाची शक्यता

Goa Womens Cricket: गोव्याच्या पोरी जगात भारी! टेनिस बॉल क्रिकेटमध्ये विजेतेपद; अंतिम लढतीत उत्तर प्रदेशला केले पराभूत

Vinoo Mankad Trophy: गुजरातचा गोव्यावर दणदणीत विजय! 5 लढतीतील चौथा पराभव; गटसाखळीत हाराकिरी

Goa Today's News Live: वीज कोसळून 38 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू? कोलवा येथे रुमच्या बाहेर आढळला मृतदेह

Netravali: 'एसी'त बसणारे ग्रामीण जनतेला सुखाने जगू देत नाहीत! व्‍याघ्र प्रकल्‍पावरुन फळदेसाईंचा टोला; नेत्रावळी ग्रामस्थांचा विरोध

SCROLL FOR NEXT