Goa: देशात सर्वाधिक पासपोर्ट जारी करणाऱ्या राज्यांची यादी जाहीर; गोव्याचा क्रमांक कितवा? वाचा

Indian Passport Statistics: कोविड महामारीच्या काळात बहुतेक राज्यांमध्ये दर एक हजार व्यक्तींमागे जारी करण्यात येणाऱ्या पासपोर्टच्या संख्येत घट झाली होती.
Indian Passport
Indian PassportDainik Gomantak
Published on
Updated on

Highest passport issuing state Goa

पणजी: गोवा आणि केरळ ही राज्ये दर एक हजार व्यक्तींमागे सर्वाधिक पासपोर्ट जारी करणारी राज्ये आहेत. २०१४ साली केरळ (लक्षद्वीपसह) दर एक हजार व्यक्तींमागे सुमारे २९ पासपोर्ट जारी करत होते, तर गोव्यात हा आकडा २८ होता. २०२३ पर्यंत, हे आकडे लक्षणीयरीत्या वाढून केरळात ४४ आणि गोव्यात ते ३९ झाले. केंद्रीय गृह मंत्रालयाने संसदीय अधिवेशन काळात विविध प्रश्नांना दिलेल्या लेखी उत्तरातून ही माहिती मिळाली आहे.

त्याशिवाय मंत्रालयाच्या संकेतस्थळावरही पूरक माहिती देण्यात आली आहे. २०१४ ते २३ याच काळात हरियाणा, पंजाब, दिल्ली आणि चंदीगडमध्ये हा आकडा १५ वरून २६ पर्यंत वाढला. परंतु, मध्य प्रदेश, झारखंड, छत्तीसगड, ओडिशा आणि बिहारसारख्या राज्यांमध्ये फारसा बदल झाला नाही. कोविड महामारीच्या काळात बहुतेक राज्यांमध्ये दर एक हजार व्यक्तींमागे जारी करण्यात येणाऱ्या पासपोर्टच्या संख्येत घट झाली होती.

Indian Passport
Goa Flight: नववर्षाच्या तोंडावर खिशाला चाट! गोव्याची हवाई सफर महागली; 'तोबा गर्दी'चा परिणाम

छत्तीसगड, गोवा, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, झारखंड, ओडिशा, उत्तराखंड, आसाम (ईशान्येकडील इतर ५ राज्यांसह) आणि मध्य प्रदेश या राज्यांचा देशात एकूण जारी पासपोर्टच्या ७ ते ९ टक्के वाटा होता. हरियाणा, पंजाब, दिल्ली आणि चंदीगड या प्रदेशांचा एकूण पासपोर्टच्या संख्येत १४ ते १८ टक्के वाटा होता.

Indian Passport
चलो अमेरिका! 2023 मध्ये 14 लाख भारतीयांना मिळाला US Visa

व्हिसा-फ्री स्थानांत सिंगापूर प्रथम

‘हेनले पासपोर्ट इंडेक्स’च्या २०२५ चा ग्लोबल मोबिलिटी रिपोर्ट प्रकाशित झाला. हा अहवाल पासपोर्टधारकांना पूर्व-व्हिसाशिवाय किती देशांमध्ये प्रवेश मिळतो, यावर आधारित आहे. सिंगापूरने १९५ स्थानांसाठी व्हिसा-फ्री प्रवेश मिळवून आपले पहिले स्थान कायम ठेवले, तर जपानने १९३ स्थानांसह दुसरे स्थान पटकावले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com