Bike Stunt Gomantak Digital Team
गोवा

Goa News : ‘स्टंटबाज’,बेदरकार दुचाकीस्वारांना हवा कायद्याचा धाक !

अधीक्षक बोसुएट सिल्वा : सध्याची कारवाई कमकुवत; केंद्रीय वाहन कायद्यात दुरुस्तीची गरज

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी : राज्यातील महामार्गावर दुचाकीने स्टंटबाजी करणाऱ्यांविरुद्ध कायद्यात असलेली कारवाई कमकुवत आहे. या कारवाईखाली संबंधित दुचाकीस्वाराला दंड देण्याची तरतूद आहे. अशा प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्रीय मोटार वाहन कायद्यातच दुरुस्ती होण्याची गरज आहे. अशा या स्टंटबाजीमुळे महामार्गावरील इतर वाहन चालकांच्या जीवितास धोका संभवतो.

म्हापसा व वेर्णा येथील दोन प्रकरणांमध्ये या दुचाकीस्वारांना वचक बसावा, म्हणून त्यांची वाहने जप्त करून निष्काळजीपणे वाहन चालवणे यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती वाहतूक पोलिस अधीक्षक बोसुएट सिल्वा यांनी दिली. वाहन कंपन्यां विविध मॉडेल्सची दुचाकी वाहने रस्त्यावर आणत आहेत. मात्र, केंद्रीय मोटार वाहन कायद्यात त्यानुसार दुरुस्ती झालेली नाही. स्टंटबाजी हा प्रकार आता नवा नाही, मात्र त्याला कायद्यानुसार बंदी आहे.

तरीही अनेक युवक स्टंटबाजी करून त्यांचे व्हिडिओ व्हायरल करत आहेत. कायद्यात दंडात्मक कारवाईच्या रकमेत वाढ झाली असली तरी त्याचा बेदरकारपणे दुचाकी हाकणाऱ्यांवर परिणाम झालेला नाही. भरमसाठ दंड आकारून संबंधित वाहनचालकाचे वाहन जप्त करता येते. बेदरकार वाहन चालवणाऱ्याचा चालक परवाना निलंबित करण्याची वाहतूक खात्याकडे शिफारस केली जाते. जप्त केलेले वाहन न्यायालयाकडून सोडवता येते. त्यामुळे त्यांना कसलाच धाक राहत नाही. त्यामुळेच कायद्यात कठोर कारवाईसाठी दुरुस्तीची गरज आहे, असे मत अधीक्षक सिल्वा यांनी व्यक्त केले.

दंड वाढवूनही हेल्मेटसक्ती धाब्यावर

केंद्र सरकारने नियम मोडणाऱ्यांना दंड रकमेत भरमसाठ वाढ केली आहे. मात्र, अजूनही वाहन चालक नियमांचे उल्लंघन करताना दिसत आहेत. काहीजण हेल्मेट न वापरता ते हातात अडकवतात किंवा दुचाकीला अडकवतात. हेल्मेट दंड रकमेत दहापटीने वाढ झाली आहे, तरी वाहन चालक या कारवाईला घाबरत नाहीत.

..तरच स्टंटबाजांना जरब !

स्टंटबाजी ही जीवघेणा प्रकार आहे. यामध्ये स्वतः चालक किंवा दुसऱ्याचा तरी जीव जाऊ शकतो. त्यामुळे अशा वाहन चालकांविरुद्ध त्यांचा चालक परवाना किमान एक वर्षासाठी तरी निलंबन करण्याची गरज आहे. जप्त केलेले वाहनही काही महिने रस्त्यावर येऊ नये, यासाठी कायद्यात तरतूद करण्याची गरज आहे. दंडाची रक्कमही चालकाच्या खिशाला चटका बसेल, अशाप्रमाणात लागू होण्याची आवश्‍यकता आहे. तरच कुठे तरी असे स्टंटबाजीचे प्रकार बंद किंवा ते नियंत्रणात येतील, असे मत एका वाहतूक अधिकाऱ्याने व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या; वाचा गोव्यातील दिवसभरातील ठळक घडामोडी

SCROLL FOR NEXT