Fire In Goa  Gomantak Digital Team
गोवा

Fire In Goa : देवळामळ-मळकर्णे येथील डोंगराला आग; वनराईची हानी

गोव्यात वेगवेगळ्या ठिकाणी लागलेल्या आगींमुळे वृक्षसंपदेसह बऱ्याच मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

केपे : देवळामळ - मळकर्णे येथील डोंगराला आज अकस्मात आग लागल्याने मोठ्या प्रमाणावर वनराईची हानी झाली.या घटनेची माहिती अग्निशमन दलाला मिळाल्यावर त्यांनी महत्प्रयासाने ही आग आटोक्यात आणली. ही आग नेमकी कशी लागली याची माहिती मिळू शकली नाही.मागील महिन्याभरात गोव्यात आगीचे सत्र सुरू होते.

म्हादई जंगलातील आग तर बरेच दिवस धुमसत होती. अग्निशमन दलाचे प्रयत्न काहीसे तोकडे पडू लागल्यानंतर हेलिकॉप्टरद्वारे आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले गेले होते.दरम्यान, गोव्यात वेगवेगळ्या ठिकाणी लागलेल्या आगींमुळे वृक्षसंपदेसह बऱ्याच मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे.

मळकर्णे येथेही बऱ्याच मोठ्या प्रमाणावर जंगलाची हानी झाली आहे.वारंवार राज्यात आगीच्या घटना घडत असल्याने वनसंपदेबरोबरच बागायतदारांचेही नुकसान होत आहे. त्यामुळे अशा घटनांना कारणीभूत असणाऱ्यांची गय केली जाऊ नये, अशी मागणी होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: संकष्टी चतुर्थीला जुळून आलाय अत्यंत दुर्मिळ शुभ योग! बाप्पाच्या आशीर्वादाने 'या' 5 राशींचे उघडणार नशिबाचे दरवाजे, नोकरी-व्यवसायात प्रगतीचे संकेत

Monsoon: पावसाळा संपायला अवघे 3 दिवस, तरी राज्यात पावसाची मोठी तूट; यंदा 36.41 इंच पाऊस कमी

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

SCROLL FOR NEXT