Accident  Dainik Gomantak
गोवा

Goa News: म्हापसात गोवा पोलिसांच्या वाहनाची कारला धडक, सुदैवाने जीवीतहानी टळली; वाचा दिवसभरातील घडामोडी

Goa Today's News Live Update's In Marathi: गोव्यातील राजकीय, गुन्हे, कला - क्रीडा - संस्कृती, पर्यटन यासह विविध क्षेत्रात घडणाऱ्या ताज्या घडामोडी.

Pramod Yadav

गोवा पोलिसांच्या वाहनाची कारला धडक, सुदैवाने जीवीतहानी टळली; म्हापसातील घटना

म्हापसा येथे मन्सूर एन्टरप्रायझेससमोर एक अपघात झाला. येथे गोवा पोलिसांच्या वाहनाची एका कारला धडक बसली. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, धडक इतकी जोरदार होती की, कारचे नुकसान झाले. हा अपघात झाल्यानंतर काही काळ या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली, पण अपघातग्रस्त वाहने तात्काळ रस्त्यावरुन बाजूला करण्यात आल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

गोव्यात बरसणार मुसळधार सरी, हवामान विभागाकडून इशारा जारी

भारतीय हवामान विभागाने (IMD), गोवा यांनी आज (9 ऑक्टोबर 2025) दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी 'NOWCAST' हवामान इशारा जारी केला. यानुसार, गोव्याच्या अनेक भागांमध्ये पुढील काही तास वातावरण बदलणार आहे. विजांचा कडकडाट आणि गडगडाटासह हलका ते मध्यम पावसाची दाट शक्यता आहे.

मोरजाई देवस्थान वादात हायकोर्टाचा कठोर इशारा; '13 ऑक्टोबरपर्यंत सर्व रेकॉर्ड्स द्या, अन्यथा FIR दाखल करु'

मोरजी येथील श्री देवी मोरजाई मंदिराच्या व्यवस्थापन वादाप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने अत्यंत कठोर भूमिका घेतली. मंदिराच्या माजी व्यवस्थापनाला 13 ऑक्टोबरपर्यंत सर्व चेकबुक, रोकड (Cash) आणि महत्त्वाचे रेकॉर्ड्स नव्या समितीकडे सुपूर्द करण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत.

सरपंच आणि सदस्यांची बैठक चालू असताना सचिव फाईल घेऊन गायब; साकोर्डातील प्रकार

साकोर्डा सरपंच व पंच सदस्यांची बैठक चालू असताना साकोर्डा सचिव बैठकीतून फाईल घेऊन निघाला. पंच सदस्यामध्ये नाराजी.

गांजा बाळगल्याप्रकरणी मडगाव पोलिसांकडून दोघांना अटक

गांजा बाळगल्याप्रकरणी मडगाव पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. रात्रीच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली. या कारवाईत २.७७ लाख रुपये किंमतीचा गांजा जप्त करण्यात आला असून, एनडीपीएस कायद्यांतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

साखळी नगरपालिकेवर सौरऊर्जा प्रकल्प; पालिकेला मिळणार 30 केव्ही वीज

साखळी नगरपालिकेच्यासौरऊर्जा प्रकल्पाचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते उदघाटन. या प्रकल्पातून नगरपालिकेला मिळणार ३० केव्ही वीज. उर्वरीत वीज देणार ग्रीडला. साखळी नगरपालिकेची प्रेरणा इतरही नगरपालिका व पंचायतींनी घ्यावी - मुख्यमंत्री डॉ. सावंत.

आजपासून गोव्यात रंगणार आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

गोव्यात आजपासून आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट सुरु होणार आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते सायंकाळी पाच वाजता या महोत्सवाचे उद्धाटन होणार आहे.

क्लास सुरु असताना विद्यार्थ्याच्या अंगावर पडला फॅन, विद्यार्थी जखमी; पर्ये सत्तरीतील सरकारी शाळेतील घटना

पर्ये – सत्तरी येथील सरकारी शाळेत क्लास सुरु असताना विद्यार्थ्याच्या अंगावर फॅन पडल्याची घटना घडली. यात विद्यार्थी जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी म्हापसा येथील अझिलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या शाळेचे अलिकडेच नूतनीकरण करण्यात आले होते.

कदंब बसच्या धडकेत २३ वर्षीय तरुणी ठार, एकजण जखमी; वेर्णा येथे झाला अपघात

वेर्णा येथे झालेल्या कदंब बसच्या अपघातात २३ वर्षीय तरुणी ठार झाली आहे. तर, कुडचडे येथील एकजण जखमी झाला आहे. पणजी ते मडगाव जाणाऱ्या बसने दुचाकीला मागून धडक दिली. यात दुचाकीवरील दोघेही रस्तावर पडले, यात दोघांना गंभीर जखम झाली. जखमी तरुणीचा मृत्यू झाला असून, दुसऱ्यावर उपचार सुरु आहेत. पोलिसांनी याप्रकरणी कदंब चालकाविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT