Arrest|Jail|Crime Canva
गोवा

Goa News: मडगाव पोलिसांची मोठी कारवाई! गांजासह दोघे अटकेत; वाचा दिवसभरातील घडामोडी

Goa Today's News Live Updates In Marathi: गोव्यात विविध क्षेत्रात दिवसभर घडणाऱ्या विविध घडामोडींच्या ताज्या अपडेट्स.

Pramod Yadav

Borim Bridge: बोरी पूल उद्यापासून बंद

बोरी येथील ४० वर्षे जुन्या पुलाच्या दुरुस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम खात्याकडून हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे हा पूल ११ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबरपर्यंत वाहतुकीसाठी बंद राहणार असल्याचे कळविलेे आहे.

सिलिंग कोसळून सांगेत ४ विद्यार्थी जखमी

सांगे येथील सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयात एक गंभीर घटना घडली. शाळेच्या छताचा एक भाग कोसळल्याने चार विद्यार्थी जखमी झाले. जखमी विद्यार्थ्यांना तात्काळ उपचारासाठी मडगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

व्हाळशी येथे कर्नाटकमधील मजूराचा पडून मृत्यू

बांधकाम चालू असलेल्या इमारतीवरून पडल्याने मजूर मृत्युमुखी. डिचोलीतील व्हाळशी येथील घटना. मयत मजूर कर्नाटकमधील.

मडगाव येथे गांजा जप्त; दोघांना अटक

मडगाव पोलिसांनी दोन लाख ७७ हजार रुपयांचा गांजा जप्त करून दोघांना अटक केली. अरबाज शेख (२५, रा. तळेबांद-दवर्ली) व झाहीद हसकोप (२२, रा. रुमडामळ गृहनिर्माण वसाहत) अशी संशयितांची नावे आहेत.

राय अपघातप्रकरणी कारचालकावर गुन्हा

तेम्बी-राय येथील अपघातप्रकरणी मायणा-कुडतरी पोलिसांनी कारचालक सुजय कोमरपंत याच्यावर गुन्हा नोंद केला आहे. १२ सप्टेंबर रोजी अपघाताची ही घटना घडली होती. कारच्या धडकेने भिकाजी डुंगू (४२) हे गंभीर जखमी झाले होते.

Goa Theft: वळपेत दागिने, रोकड लंपास

वळपे - विर्नोडा येथील नीलेश प्रभाकर आरोंदेकर यांच्या राहत्या घरातून ६ रोजी सुमारे सात लाख रुपयांचे सोन्याचे दागिने व एक लाख रुपयांची रोकड चोरून नेल्याची तक्रार काल पेडणे पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

आमदार मायकल लोबोंच्या रेस्टॉरंटमध्ये चोरी, कॅश घेऊन चोरटे फरार

कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांच्या मालकीच्या रेस्टॉरंटमध्ये चोरी झाल्याचे उघडकीस आले आहे. लोबो यांच्या मालकीचे हणजूण येथे रेस्टॉरंट आहे. तिथे चोरट्यांनी चोरी करुन रोकड लंपास केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरु केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mitchell Starc Fight: लाईव्ह सामन्यात 'रनिंग लाईन'वरुन राडा! मिचेल स्टार्क मेहदी हसन मिराजशी भिडला; हाय-व्होल्टेज ड्रामा व्हायरल

Goa Olympic Association: 'गोवा ऑलिंपिक'ला 21 वर्षांनंतर लाभणार नवा सचिव, गुरुदत्त भक्ता यांची दोन दशकांची कारकीर्द; महत्त्वाच्या स्पर्धांचे राज्यात आयोजन

Shukra Pushkaransh Yog 2026: शुक्रदेवांची अफाट कृपादृष्टी! 15 ऑगस्टपासून 'या' राशींच्या नशिबाला मिळणार नवी दिशा; 'शुक्र पुष्करांश' योग करणार मालामाल

Calangute Dance Bar: कळंगुटमधील 'डान्स बार' बंद करा, गट काँग्रेस समितीची मागणी; पोलिसांना निवेदन सादर

Child Disappearance Goa: राज्यात पाच वर्षांत हरवली 256 मुले, 106 सापडली,150 बेपत्ता

SCROLL FOR NEXT