Goa News Live Updates Dainik Gomantak
गोवा

Goa News: "वीज बिलांमध्ये कोणतीही वाढ JERC द्वारे केली जाते" वीजमंत्री

Goa Today's News Live Update's: गोव्यातील राजकारण, समाजकारण, गुन्हे, पर्यटन, क्रीडा, कला - संस्कृती यासह विविध क्षेत्रातील ताज्या बातम्या.

Pramod Yadav

हणजूण येथे एकजण समुद्रात बुडाला, रात्रीच्या सुमारास घडली घटना

हणजूण येथे समुद्रात रात्रीच्या सुमारास एकजण बुडाल्याची घटना घडली. रात्री साडे बाराच्या सुमारास ही घटना घडली. समुद्र खवळलेल्या असल्याने व्यक्तीचा शोध घेण्यास अग्निशमन दलाच्या जवानांना अडचणी येत आहेत. सकाळी पुन्हा शोधकार्य सुरु करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्र्यांनी दसऱ्यानिमित्त केली वाहनांची पूजा

दसरोत्सवानिमित्त मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपल्या निवासस्थानी वाहनांची पूजा केली. दसरोत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा देत खुप नवनवीन गोष्टींचा सरकारतर्फे शुभारंभ या दसरोत्सवातून होणार असल्याचे सांगितले.

राजकीय फायद्यासाठी काहीजण लोकांमध्ये फूट पाडताहेत; मुख्यमंत्री सावंत

गोव्याची ओळख ही एकता आणि शांततेसाठी आहे, सर्वांनी त्याच मार्गावर चालावे. विविध धर्माचे लोक राज्यात गुण्यागोविंदाने नांदतात पण, राजकीय फायद्यासाठी काहीजण नागरिकांध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करताहेत. पण, सर्वांनी एकत्र उभं राहायला हवं, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले.

दूधसागर पर्यटनास सुरुवात

दुधसागर पर्यटनास आजपासून सुरुवात. मागण्या पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ११ दिवसांची वेळ मागितली आहे. मागण्या पुर्ण होत नाही तो पर्यंत ऑफलाईन सोडण्यासाठी सरकारने परवानगी घ्यावी, अशी सभेत मागणी करण्यात आली.

पुढील वर्षापासून 6 वर्षांनंतरच पहिलीत प्रवेश

नवीन शैक्षणिक धोरणानुसार पुढील वर्षापासून सहा वर्षे पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच पहिलीत प्रवेश मिळणार. त्यामुळे गोव्यात सुमारे ४ हजार नवीन भरतीत घट होण्याची शक्यता आहे. परंतु ही तूट २०२७ पासून जाग्यावर येणार. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत. ग्रामीण भागातील सरकारी प्राथमिक शाळांमध्ये स्थानिकांची मुले कमी व बिगरगोमंतकीय मुले जास्त भरती होता आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली खंत

फोंडा-मडकई मार्गावरील वाहतूक पुढील 10 दिवस उंडीर मार्गावर वळवणार

गावणे-बांदोडा येथील पूर्वाचारी मंदिराजवळील संरक्षण भिंत बांधण्याचे काम सुरू झाल्यामुळे, फोंडा-मडकई मार्गावरील वाहतूक पुढील १० दिवस उंडीर मार्गावर वळविण्यात येणार. वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांची माहिती

कुर्टी येथील वीज खात्याच्या उप-विभागात लागली आग

कुर्टी येथील वीज खात्याच्या उप-विभागात लागली आग. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज.

वाळपईत मोटार सायकल पायलटांना मोफत हेल्मेट वितरण

डिचोली विभाग वाहतुक खात्यातर्फे व सत्तरी पत्रकार संघाच्या सहकार्यातून आज बुधवारी सायंकाळी वाळपईतील १७ मोटार सायकल पायलटांना मोफत हेल्मेट वितरण करण्यात आले. यावेळी डिचोलीचे वाहतूक उपसंचालक संदीप पारोडकर,‌ आरटीओ अधिकारी शिवानंद पेडणेकर , मिथून रामनाथकर, रवींद्र सातार्डेकर, वाळपई भाग शिक्षणाधिकारी प्रसाद पर्येकर, पत्रकार संघाचे अध्यक्ष देविदास गावकर उपस्थित होते.

नवरात्रोत्सवात मुख्यमंत्र्यांनी दिली राधाकृष्ण मंदिराला भेट

नवरात्रोत्सवात साखळीतील श्री राधाकृष्ण मुरलीधर संस्थानात सुरू असलेल्या आरती मखरोत्सवाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी भेट देऊन श्रीचे दर्शन घेतले. गोव्याछ नवरात्रोत्सव व मखरोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सोहळ्यासाठी लोकांचीही मोठी गर्दी असते.

कळंगुट पंचायतीने गांधी जयंतीनिमित्त राबवला ग्रामविकास कार्यक्रम

गांधी जयंती आणि लाल बहादूर शास्त्री जयंतीनिमित्त, कळंगुटच्या ग्रामपंचायतीने गुरुवारी सकाळी त्यांच्या ग्रामविकास कार्यक्रमाचे उद्घाटन केले, ज्यामुळे गावाच्या शाश्वत आणि समग्र विकासावर लक्ष केंद्रित करणाऱ्या दोन आठवड्यांच्या उपक्रमाची सुरुवात झाली.

"वीज बिलांमध्ये कोणतीही वाढ JERC द्वारे केली जाते" वीजमंत्री

वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी स्पष्ट केले की वीज बिलांमध्ये कोणतीही वाढ संयुक्त वीज नियामक आयोग (JERC) द्वारे केली जाते आणि ती राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mitchell Starc Fight: लाईव्ह सामन्यात 'रनिंग लाईन'वरुन राडा! मिचेल स्टार्क मेहदी हसन मिराजशी भिडला; हाय-व्होल्टेज ड्रामा व्हायरल

Goa Olympic Association: 'गोवा ऑलिंपिक'ला 21 वर्षांनंतर लाभणार नवा सचिव, गुरुदत्त भक्ता यांची दोन दशकांची कारकीर्द; महत्त्वाच्या स्पर्धांचे राज्यात आयोजन

Shukra Pushkaransh Yog 2026: शुक्रदेवांची अफाट कृपादृष्टी! 15 ऑगस्टपासून 'या' राशींच्या नशिबाला मिळणार नवी दिशा; 'शुक्र पुष्करांश' योग करणार मालामाल

Calangute Dance Bar: कळंगुटमधील 'डान्स बार' बंद करा, गट काँग्रेस समितीची मागणी; पोलिसांना निवेदन सादर

Child Disappearance Goa: राज्यात पाच वर्षांत हरवली 256 मुले, 106 सापडली,150 बेपत्ता

SCROLL FOR NEXT