Goa News Live Update 19 December 2023:
Goa News Live Update 19 December 2023: Dainik Gomantak
गोवा

Goa News Update 19 December 2023: म्हादईच्या मुद्द्यावर सिद्धरामय्यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट

Akshay Nirmale

म्हादईच्या मुद्द्यावर सिद्धरामय्यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन ''म्हादईच्या मुद्द्यावर त्वरित निर्णय घेऊन प्रकल्पाला लवकरात लवकर पर्यावरणीय मंजुरी द्यावी'' अशी मागणी त्यांनी केलीय.

मोपावर 2.22 कोटींची सोने जप्त

अबुधाबीतून तस्करी करण्यात आलेले 2.22 कोटी रुपये किंमतीचे सोने जप्त करण्यात आले आहे. केंद्रीय महसूल गुप्तचर विभागाने 3.5 किलो सोने जप्त केले आहे. या कारवाईत उत्तर प्रदेश आणि राजस्थान येथील दोघांना अटक करण्यात आली आहे.

सिद्धरामय्या मोदींच्या भेटीला दिल्लीत, म्हादई प्रकल्पाला मंजुरीची मागणी

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. म्हादई प्रकल्पाला लवकरात लवकर मंजुरीची मागणी केली.

40 हजार रुपयांची चोरी प्रकरणी पेडणे पोलिसांकडून आसामच्या एकाला अटक

चोरीप्रकरणी पेडणे पोलिसांकडून आसामच्या एकाला अटक करण्यात आली आहे. चोरट्याने वीस हजार रोख, मोबाईल आणि कपडे असे एकूण 40 हजार रुपयांची चोरी केली होती. हरमल येथील हॉटेलमधून त्याला अटक करण्यात आली.

पर्वरीच्या उड्डाण पुलाची पायाभरणी आणि झुआरीच्या दुसऱ्या लेनचे उद्घाटन एकाच दिवशी

पर्वरीच्या उड्डाण पुलाचा पायाभरणी सोहळा 22 डिसेंबर रोजी होणार आहे. तर, त्याच दिवशी झुआरी पुलाच्या दुसऱ्या लेनचेही उद्घाटन होणार असल्याचे माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली.

पंच निलम नाईक यांची ZOIL कंपनीविरोधात पंतप्रधान कार्यालय, पेट्रोलियम मंत्रालयाकडे तक्रार

दाबोळी माटवे व्हडले भाट परिसरात पेट्रोल डिझेल इंधनाचा साठा विहिरीत नाल्यात मिसळत आहे. २५ दिवस उलटले तरी संबंधित सरकारी किंवा ZOIL ने उपाययोजना केली नसल्याने,पंच निलम नाईक यांनी कंपनी व संबंधीत विरोधात पंतप्रधान कार्यालय, पेट्रोलियम मंत्रालयात तक्रार दाखल केली आहे. सोमवारी ZOILविरुद्ध न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

राहुल गांधींनीही गोमंतकीयांना दिल्या गोवा मुक्ती दिनाच्या शुभेच्छा 

गोवा मुक्ती दिनानिमित्त काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गोमतकीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या स्वातंत्र्यसैनिकांचे बलिदान आणि आपल्या सशस्त्र दलाच्या शौर्यामुळे 1961 साली गोव्याला पोर्तुगीज राजवटीतून स्वातंत्र्य मिळाले. कष्टाने मिळवलेल्या स्वातंत्र्याचा आत्मा जपण्याचा आणि गोव्याची संस्कृती आणि वारशाचे रक्षण करण्याची शपथ घेऊया असे राहुल गांधींनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

बाळ्ळी रूग्णालयात सुविधांसाठी आमदार डिकॉस्टा आक्रमक 

बाळ्ळी रुग्णालयात आरोग्य सुविधांचा अभाव असल्याने आमदार आल्टन डिकॉस्टा आणि स्थानिक आक्रमक झाले आहेत. आपल्या मागण्या घेऊन रुग्णालयात धडकले असून अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावेळी त्यांनी आपले मागणीपत्र रुग्णालयातील अधिकाऱ्यांना दिले.

डिचोलीत शांतादुर्गा देवीच्या उत्सवाची सांगता 

डिचोलीत शांतादुर्गा देवीचा जयघोष. पारंपरिक विधी आणि हजारो भक्तांच्या उपस्थितीत नवा सोमवार साजरा झाला. त्यानंतर मंगळवारी देवळात पालखी आल्यावर या उत्सवाची सांगता झाली.

2050 पुर्वी कार्बन मुक्तीचे ध्येय साध्य करू ः मुख्यमंत्री सावंत 

गोवा मुक्ती दिन कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, 2050 पुर्वी कार्बन मुक्तीचे ध्येय साध्य करू. तरूणांना येत्या काळात रोजगाराच्या नवीन ४० हजार संधी उपलब्ध करून देणार आहे. गोव्यात शेती क्षेत्राला चालना देण्यासाठी गोवा सरकार कार्यरत आहे. गोव्याच्या जीडीपीमध्येही भरीव वाढ झाली आहे.

साखळी नगरपालिकेतर्फे गोवा मुक्तीदिन साजरा

साखळी नगरपालिकेतर्फे गोवा मुक्तीदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नगराध्यक्षा रश्मी देसाई यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सहकारी नगरसेवकांची उपस्थिती होती. गोवा मुक्तीनंतर गोव्याने गेल्या ६२ वर्षांत मोठी प्रगती केली आहे.

आज मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली राज्यात विकासाला गती मिळाली आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही मोलाचे सहकार्य लाभत आहे, असे नगराध्यक्षा रश्मी देसाई यांनी यावेळी म्हटले.

राज्यभरात गोवा मुक्ती दिनाचा उत्साह, ध्वजवंदनासह विविध कार्यक्रम 

डिचोलीत गोवा मुक्ती दिन कार्यक्रमात आमदार प्रेमेंद्र शेट आणि आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांची उपस्थिती प्रेमेंद्र शेट यांच्या हस्ते ध्वजवंदन. पोलिस आणि जवानांनी दिली मानवंदना.

समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी सांगे येथे ध्वजवंदन केले. यावेळी जि. प. सदस्यांसह शासकीय अधिकारी, इतर लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

सत्तरी उपजिल्हाधिकारी कार्यालय येथे आमदार डॉ. देविया राणे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले.

गोवा मुक्ती दिन कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू 

गोवा मुक्ती दिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्याच्या विकासाचा लेखाजेखा मांडला. त्यांनी सरकारच्या विविध योजनांची माहितीही दिली आहे. यावेळी 2050 पूर्वीच कार्बन उत्सर्जन मुक्तीचे लक्ष्य गाठू, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. यावेळी राज्यातील विविध अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Todays Update: लाटंबार्से पंचायतीत सत्ताबदल अटळ; आमदार चंद्रकात शेट्ये यांना मोठा धक्का

Margao: दिगंबर कामतांची चिंता वाढली; मडगावमध्ये सरदेसाईंचा 'जनता दरबार', शेकडो लोकांना मांडल्या समस्या

Goa Assembly Session: ST आरक्षणासाठी युरी आलेमाव अधिवेशनात आवाज उठवणार; 'अस्मिताय दिसा'सह 4 खाजगी ठराव

Goa News: कोलवा PSI ने मारहाण केल्याचा आरोप करणाऱ्या महिलेवर खंडणीचा गुन्हा, पतीसह झाली होती अटक

Futsal Goa: गोव्याच्या आंबेली स्पोर्टस क्लबचा गतविजेत्यांना मिनर्व्हा अकादमीला धक्का, उपांत्य फेरीत प्रवेश

SCROLL FOR NEXT