In Canacona the tanker driver was brutally beaten by youths and forced to apologize Dainik Gomantak
गोवा

Goa News: रस्त्यावर गुडघे टेकवून माफी मागण्याची टँकरचालकाला सक्ती; काणकोणात अमानुष वागणुकीचा धनगर समाजाकडून निषेध

गोमन्तक डिजिटल टीम

Goa News: काणकोण येथील एक टँकरचालक आणि इतरांना भाटपाल येथील काही युवकांनी बेदम मारहाण करून त्यांना रस्त्यावर गुडघे टेकवून पंचसदस्याची माफी मागण्याची सक्ती केली. या प्रकाराचा धनगर समाज उन्नती मंडळाच्या काणकोण शाखेने आज पत्रकार परिषद घेऊन जाहीर निषेध केला. या पत्रकार परिषदेला काणकोण शाखेचे अध्यक्ष तुकाराम बावधान, आलोक मोडक, गंगो झरो, रूपेश झरो, बाबू वरक, बाबू झरो, दिनू जंगले, स्वप्नेश झरो, सगो झरो, विठ्ठल वरक, तसेच अन्य सदस्य उपस्थित होते.

शुक्रवारी सगो झरो हे श्रीस्थळहून जलपुरवठा खात्यामार्फत गावडोंगरी आणि खोतिगाव पंचायत क्षेत्रांत पाणी पुरविण्यासाठी जात असता, भाटपाल येथील काही युवकांनी त्यांचा टँकर अडवून त्यांच्यासह मित्राला बेदम मारहाण केली. जोपर्यंत तुम्ही ‘त्या’ पंचायत सदस्याची माफी मागणार नाही, तोपर्यंत सुटका केली जाणार नाही, अशी तंबी दिली. यासंदर्भात सगो झरो यांनी शुक्रवारी रात्री उशिरा काणकोण पोलिसांत पाचजणांविरोधात तक्रार दाखल केली आहे. छोट्या समाजावर होणारा अन्याय खपवून घेणार नसल्याचे मोडक यांनी सांगितले.

प्रकरणाला पूर्ववैमनस्याची किनार

यासंदर्भात काणकोण पोलिसांनी आज (शनिवारी) त्या पाचजणांना पोलिस ठाण्यात बोलावून प्राथमिक चौकशी केली, असे काणकोणचे पोलिस निरीक्षक हरिष राऊत देसाई यांनी सांगितले. ही घटना पूर्ववैमनस्यातून घडली का, हे तपासून पाहण्यात येत आहे. यासंदर्भात सभापती रमेश तवडकर यांनाही निवेदन देणार असल्याचे आलोक मोडक यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ponda: बहिणीने धाडस केले पण भाऊ बचावला नाही; 17 तासानंतर आढळला दर्शन नार्वेकरचा मृतदेह

मेरशीत एक महिन्यापासून उभ्या जीपमध्ये आढळला मृतदेह, परिसरात खळबळ; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Belgaum Highway: गोवा-बेळगाव महामार्गावरील वाहतूक ठप्प, दोन्ही बाजूला 4-5 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा

Divar Island: पाचव्या शतकातील निर्मिती प्रक्रिया वापरुन गोव्यात उभारलं जातंय जहाज; पुढल्या वर्षी करणार गुजरात ते मस्कत प्रवास

Funny Viral Video: 3 वर्षापासून पैसे साठवून 4 मित्र गोव्याला निघाले, टोल भरण्यातच खिसे रिकामे झाले

SCROLL FOR NEXT