Goa News Dainik Gomantak
गोवा

Goa News: पणजीत उद्या ‘अर्थसंकल्पीय तरतुदीं’वर मार्गदर्शक चर्चासत्र

सहकार क्षेत्रासाठी संसदीय अर्थसंकल्पीय तरतुदी या विषयावर मार्गदर्शन सत्र व चर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

दैनिक गोमन्तक

Goa News: सहकार भारती गोवा प्रदेश व गोवा राज्य सहकारी बँकेच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी 23 फेब्रुवारी रोजी सहकार क्षेत्रासाठी संसदीय अर्थसंकल्पीय तरतुदी या विषयावर मार्गदर्शन सत्र व चर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी प्रमुख वक्ते सहकार भारतीचे माजी अध्यक्ष व संस्थापक व विद्यमान रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे हे उपस्थित राहणार आहेत. या चर्चासत्रात ते सहकारी बँका तसेच संस्थांना या क्षेत्रात असलेल्या सुविधा व सबसिडी याचे मार्गदर्शन करणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष उल्हास फळदेसाई यांनी दिली.

पणजीत या चर्चासंदर्भात माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे एनआरआय आयुक्त ॲड. नरेंद्र सावईकर हे उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम दुपारी 3 वा. ईडीसी पाटो येथील सहकार संकुल या बँकेच्या सभागृहात होणार आहे.

आज पत्रकार परिषदेला बँकेचे उपाध्यक्ष पांडुरंग कुट्टीकर, सहकार भारतीचे गोवा प्रदेश महिला अध्यक्षा सरिता बोरकर, कार्यकारिणी सदस्य महेश आमोणकर, विठ्ठल वेर्णेकर, महासचिव अशोक गावडे, रघुवीर वस्त, दिलीप पाटील व सुभाष हळर्णकर उपस्थित होते.

माजी मंत्री प्रभूंकडून कायद्याचा मसुदा

सहकार क्षेत्रातून 25 टक्के महसुली उत्पन्न व्हायला हवे, असे केंद्राचे मत आहे. त्यासाठी ‘अम्ब्रेला सहकार’ची स्थापन करण्यात आली आहे. कृषी उत्पादनासाठी व्यासपीठ उपलब्ध करून त्याच्या निर्यातीला वाव देण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.

त्यामुळे शेतकऱ्याला योग्य मोबदला मिळू शकेल. सहकार क्षेत्रातील लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी संधी उपलब्ध करण्यात येणार आहे. सध्या नव्या कायद्याचा मसुदा तयार करण्यात येत असून माजी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू त्या मंडळाचे अध्यक्ष आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Elections 2027: गोव्यात भाजपचं 'मिशन 30'! फातोर्ड्यात सरदेसाईंना घेरण्याची तयारी; मायकल लोबोंचं सूचक विधान

Chimbel Unity Mall: 'युनिटी मॉल'ला न्यायालयाचा मोठा दणका! पंचायत सचिवांनी दिलेला बांधकाम परवाना रद्द

IND vs NZ 2nd ODI: विराट कोहलीचा राजकोटमध्ये धमाका! सचिन तेंडुलकरचा मोडला 17 वर्षांचा रेकॉर्ड; न्यूझीलंडविरुद्ध बनला भारताचा 'रनमशीन' VIDEO

Goa Assembly Live: पर्रा परिसरात चोरांचा धुमाकूळ

Goa Assembly Session: मंत्रिमंडळ निर्णयांच्या गोपनीयतेवरून विधानसभेत रणकंदन; 16 जानेवारीला चर्चेची मुख्यमंत्र्यांची ग्वाही

SCROLL FOR NEXT