Lina Prabhu Dainik Gomantak
गोवा

Goa News: दिव्यांगांची माय हरपली

Goa News: एनएबी इंडिया आणि एनएबी, गोवा शाखेसाठी त्यांनी चार दशके सेवा बजावली

दैनिक गोमन्तक डिजिटल

Goa News: नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाईंड (एनएबी), गोवा शाखेच्या वरिष्ठ सल्लागार तथा मुख्य शिक्षिका लीना प्रभू यांचे आज अल्प आजाराने निधन झाले. लीना प्रभू यांनी अंधांच्या सेवेसाठी प्रदीर्घ काळ कार्य केले आहे.

एनएबी इंडिया आणि एनएबी, गोवा शाखेसाठी त्यांनी चार दशके सेवा बजावली आहे. त्या एनएबी, गोवा शाखेत २००१ साली दाखल झाल्या होत्या. आणि तेथील मुलांसाठी त्यांचे स्थान हे मातेसमान होते. अत्यंत प्रेमळ, काळजी वाहणाऱ्या आणि अंधांसाठी समर्पित भावनेने त्यांनी काम केले आहे.

त्यामुळे त्यांनी एनएबी सोडल्यानंतरही तेथील विद्यार्थी त्यांच्या संपर्कात राहिले. ओरिएंटेशन आणि मोबिलिटीच्या शिक्षिका या नात्याने त्यांनी घेतलेल्या अनुभवांवर आधारीत त्यांनी ‘लाईट टुवर्डस्‌ इंडिपेंडन्स’ हे पुस्तक लिहिले आहे.

त्यांनी अनेक पुरस्कार प्राप्त केले असून त्यात रिहॅबिलिटेशन कौन्सिल ॲक्ट ऑफ इंडिया (नवी दिल्ली), नॅशनल सोसायटी ऑफ इक्वल अपॉर्च्युनिटीज फॉर डिसेबल्ड, प्रगत मराठी ब्रेल साठी लुईस ब्रेल मेमोरियल रिसर्च सेंटर आदींकडून मिळालेल्या प्रमाणपत्रांचा समावेश आहे.

त्यांच्या निधनामुळे आपली अपरिमीत हानी झाली असल्याचे एनएबीने म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: रविवारचा दिवस ठरणार टर्निंग पॉईंट! नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना मिळणार मोठी गुड न्यूज, पण 'या' राशींनी राहावे अत्यंत सावध

Jungle Life and Biodiversity: निसर्गाची 'जंगल' ही कादंबरी; पशू-पक्ष्यांपासून वृक्षवेलींपर्यंत उलगडते निसर्गाची अद्भुत जीवनकथा

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

SCROLL FOR NEXT