Goa News : मुख्यमंत्री सावंत  Dainik Gomantak
गोवा

मुख्यमंत्री सावंत यांनी माफी मागावी..!

प्रसारमाध्यमांना प्रवेश नाकारल्याने काँग्रेसतर्फे निषेध..

दैनिक गोमन्तक

पणजी Goa News: आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (IFFI 2021) उद्‍घाटन समारंभाला प्रवेश नाकारण्यात आल्याने भाजप (BJP) सरकारने प्रसारमाध्यामांचेही अधिकार काढून घेतले आहे. यापूर्वी राज्यातील सरकारने गोवा (Goa) विक्रीस काढला होता व आंतरराष्‍ट्रीय स्तरावरील कार्यक्रमाचे अधिकारही एका खासगी वाहिनीला विकून टाकले आहेत. प्रसारमाध्यमांवर करण्यात आलेल्या या अन्यायाची मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी माफी मागावी.

इफ्फीच्या समारोप समारंभाला पुन्हा प्रवेश नाकारला गेल्यास काँग्रेस प्रसारमाध्यमांना पाठिंबा देत मोठे आंदोलन उभारले जाईल असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दिला.

राज्यातील भाजप सरकार हे असंवेदनशील व दोषपूर्ण सरकार आहे. प्रसारमाध्यमाला जे स्वतंत्र देण्यात आले आहे त्याचा या सरकारने अपमान केला आहे त्याचा काँग्रेसतर्फे निषेध करण्यात येत आहे. प्रसारमाध्यमांवर झालेल्या या अन्यायाची केंद्रीयमंत्री अनुराग ठाकूर, मुख्यमंत्री तसेच गोवा मनोरंजन संस्थेने माफी मागायला हवी. गोव्यात इफ्फी सुरू झाल्यापासून असा अन्याय प्रसारमाध्यमांवर कधीच झाला नव्हता.

हे अधिकार विकून केंद्र व राज्य सरकार त्यातून महसूल मिळवण्याचा प्रयत्न करत आहे, अशी टीका करून चोडणकर म्हणाले की, विमानतळ, रेल्वे व शेती असे अनेक क्षेत्र सरकारने खासगी कंपन्यांना भागिदारीवर देऊन टाकली आहेत. प्रसारमाध्यमांना दूर ठेवून त्यांना नियंत्रणात व टीकेपासून दूर ठेवण्याचा हा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. प्रसारमाध्यमाच्या क्षेत्रात घुसून हे क्षेत्रही नष्ट करण्याचा डाव केंद्र सरकारने चालविला आहे.

हा तर भ्रष्टाचार महोत्सव: चोडणकर

दोन वर्षापूर्वी राज्यात झालेल्या इफ्फीच्या आयोजनावेळी काँग्रेसतर्फे म्हादई बचावसाठी येणाऱ्या प्रमुख पाहुण्यांना काळे झेंडे दाखवून राज्याकडून म्हादई वाचविण्यासाठी होत असलेल्या दुर्लक्षाबद्दल निषेध करण्यात आला होता. तेव्हा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना अटकही झाली होती. ही इफ्फी म्हणजे आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार महोत्सव असल्याचा टोमणा प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी लगावला.

‘इफ्फी’ समारोपाला प्रवेश देऊ : मुख्यमंत्री

प्रसारमाध्यमांना इफ्फीच्या उद्‍घाटन कार्यक्रमासाठी प्रवेश नाकारण्यात आल्याबद्दल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ‘गुज’ संघटनेशी संपर्क साधून असा प्रकार समारोप समारंभावेळी होणार नाही असे स्पष्ट केले. गोवा मनोरंजन संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष फळदेसाई यांनी या घटनेप्रकरणी माफी मागितली. या प्रवेशासंदर्भात काही तरी गोंधळ उडाल्याचे त्यांनी स्पष्टीकरण दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli Test Retirement: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

Viral Video: डिलिव्हरी ऑर्डर कोणाची, यावरून वाद अन् थेट हाणामारी! तरुणाला पळवून-पळवून चोपलं, व्हिडिओ व्हायरल

Riyadh Airport Missile Attack: मिसाइल कोसळताच उठला आगीचा मोठा लोळ, रियाद विमानतळावरील 'त्या' थरारक क्षणांचा हादरवणारा व्हिडिओ व्हायरल

Sudan Gold Mine Attack: सुदानमधील सोन्याच्या खाणीवर भीषण हवाई हल्ला, 72 जणांचा मृत्यू; धडकी भरवणारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

CJP Press Conference: 'देशात आणीबाणीपेक्षाही भयावह परिस्थिती', आशुतोष रांकाचा मोदी सरकारवर हल्लाबोल; ज्ञानेश कुमारांना वाचवण्यासाठी केंद्राची धडपड

SCROLL FOR NEXT