Night Party Dainik Gomantak
गोवा

Goa News: न्यू ईअरची धूम संपली, तरीही रात्रभर पार्ट्या सुरुच...

पोलिसांचे दुर्लक्ष- समुद्र किनारी भागात कर्णकर्कश संगीत, ध्वनिप्रदूषणात वाढ

दैनिक गोमन्तक

Goa News: समुद्र किनारी भागात रात्री दहा वाजल्यानंतरही खुल्या जागेत कर्णकर्कश संगीत लावून अद्यापही पार्ट्या सुरूच असल्याचे चित्र दिसून येते. ख्रिसमस व न्यू एअरची धूम संपूनही किनारी भागांत रात्रभर पार्ट्यांचे आयोजन अद्याप काही थांबलेले नाही.

ध्वनिप्रदूषणात वाढ झाली असून किनारी पट्ट्यात पार्ट्यांचा हा धुमाकूळ सुरूच असून ‘लेट नाईट’ पार्ट्यांचा हा हँगओव्हर अजूनही उतरलेला दिसत नाही, याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे.

शनिवारी हणजूण परिसरात अशा प्रकारे मध्यरात्री 12 वाजल्यानंतर न्यायालयाच्या आदेशाला ठेंगा दाखवून मोठमोठ्याने पार्ट्यां सुरुच होत्या. याचे काही व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले होते. एकीकडे सरकार पर्यावरण संरक्षणासाठी आम्ही अमुकतमुक करतोय असा दावा करते. मात्र प्रत्यक्षात कारवाईची पोलिसांकडून कारवाई शून्यच म्हणावी लागेल.

शनिवारी सरसंघचालक मोहन भागवत यांनी पणजीत झालेल्या महासांघिक कार्यक्रमात पर्यावरण राखण्याचा संदेश दिला, असे असताना अजूनही किनारी भागांतील क्लब तसेच हॉटेल्सवाल्यांकडून याचे सर्रास उल्लंघन होताना दिसते.

सध्या राज्यात पर्यटन हंगाम सुरू असल्याने देश-विदेशांतील पर्यटकांची मोठ्या संख्येने गोव्यात ये-जा सुरू आहे. त्यातील अनेक पर्यटकांनी हॉटेल्ससह रात्रीच्या पार्ट्यांचेही आधीच बुकिंग केलेले असते.

पर्यटक येत असल्याने त्यांच्याकरिता पार्ट्या आयोजित करण्यास हॉटेल्स तसेच क्लबचे व्यवस्थापन मागचापुढचा विचार करत नाहीत. असे करताना संबंधित व्यवस्थापन पर्यावरणासोबत न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली करताहेत.

कायद्याचे उल्लंघन होत असताना पोलिस किंवा प्रशासकीय यंत्रणा मात्र याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करतात. हेच हणजूण परिसरात शनिवारी मध्यरात्रीपर्यंत चाललेल्या या कर्णकर्कश पार्ट्यांकडे पाहून समजते.

मध्यरात्री संगीत रजनी

रात्री 10 वाजेपर्यंत संगीत वाजविण्यास मान्यता असली तरी उच्च न्यायालयाच्या आदेशाला या पब, क्लब व हॉटेल्सवाल्यांकडून सध्या केराची टोपली दाखवली जात आहे. मध्यरात्रीनंतर संगीत रजनी पार्ट्यां उत्तर गोव्यातील किनारी भागांत अजूनही कर्णकर्कशपणे सुरूअ सतो आणि विकएण्डच्या दिवसांत हे प्रकार वारंवार व सातत्याने घडताहेत.

तसेच, कायद्याचे उल्लंघन होत असल्यास ते नजरेस आणून द्यावे. शनिवारी रात्री मी एका लग्नसोहळ्यास गेलेलो. तिथे त्यांनी दहापूर्वीच संगीत बंद केले. हे पाहून लक्षात येते की कायद्याचे पालनकर्ते आहेत.जिल्हाधिकारी तसेच उपजिल्हाधिकारी कार्यालयाने यावर नजर ठेवणे गरजेचे.

निर्बंधामुळे काही पर्यटनावर परिणाम होतोय, मात्र कायद्याचे पालन होणे गरजेचे. काही बदलासाठी कायद्यात दुरुस्ती हवी. अन्यथा आम्ही काहीच करू शकत नाही. अशावेळी अल्पकालीन स्थितीत पर्यटनास पुढे कसे नेता येईल, हे पाहावे लागेल. त्याशिवाय कायद्याचे व न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणे बंधनकारक आहे. - रोहन खंवटे, पर्यावरणमंत्री

तसेच, क्लबमधील पार्टीत प्रवेशासाठी रात्रीच्या वेळी अव्वाचे सव्वा दर आकारले जातात. हे दर दहा ते पन्नास हजार रुपये आणि त्याहीपेक्षा जास्त होते, अधिकतर याठिकाणी उच्चभ्रू मंडळी अशा पार्ट्यांमध्ये एन्जॉय करण्यासाठी येतात.

मुला-मुलींचे गट क्लबच्या आवारात गटागटाने येतात. हणजूण परिसरात या गोष्टी सातत्याने घडताहेत, मात्र पोलिस यंत्रणा याकडे कानाडोळा करते. त्यामुळे पोलिसांचेच या पार्ट्यांना अभय असते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: शिखर धवन-युसूफ पठाणची वादळी खेळी निष्फळ, कांगारूंनी भारताचा 4 गडी राखून केला पराभव

Usgaon Bridge: उसगावात 62 वर्षे जुनाट पूल दुरावस्थेत; स्थानिकांची दुरुस्तीची मागणी

Valpoi: बाप रे... गायीच्या पोटात प्लास्टिकचा ढीग! शस्त्रक्रिया करून तब्बल 26 किलो प्लास्टिक काढलं

Viral News: प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली पत्नी, बेदम मार खाल्यानंतर नग्नच पळाला लव्हर Watch Video

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

SCROLL FOR NEXT