New tunnels in Old Goa and Pernem Dainik Gomantak
गोवा

राज्यात आणखी दोन नवे बोगदे, 1,500 कोटी खर्च; जुने गोवे व पेडणे येथे समांतर बोगद्यांचा प्रस्ताव

New tunnels in Old Goa and Pernem: जुने गोवे व पेडणे येथे दोन नवीन बोगदे बांधण्याचा प्रस्ताव कोकण रेल्वे कॉर्पोरेशनने सादर केला आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

सासष्टी: जुने गोवे व पेडणे येथे दोन नवीन बोगदे बांधण्याचा प्रस्ताव कोकण रेल्वे कॉर्पोरेशनने सादर केला आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री आश्वीन वैष्णव यांनी गोव्यातील रेल्वे सुधारणेसाठी अर्थसंकल्पात ५१५ कोटी रुपयांची तरतूद केली होती. शिवाय ४,३०० कोटी रुपयांची कामे चालू आहेत व जी प्रस्तावित आहेत, त्यासाठी तरतूद करण्यात आली होती.

यात या दोन बोगद्यांचा समावेश आहे, असे कोकण रेल्वे महामंडळाचे क्षेत्रीय उपव्यवस्थापक व जनसंपर्क अधिकारी बबन घाटगे यांनी सांगितले.

घाटगे यांनी सांगितले की, या दोन बोगद्यांचा प्रस्ताव आहे व लवकरच त्यावर रेल्वे मंत्रालयाकडून अंतिम निर्णय होईल. पेडणे व जुने गोवे येथील बोगदे तीन दशकांपासून अस्तित्वात आहेत. ही बोगदे संरचना व बांधकामाच्या दृष्टीने कमकुवत झाली आहेत. त्यामुळे या दोन्ही बोगद्यांच्या समांतर दुसरा बोगदा बांधण्यासाठी कोकण रेल्वे महामंडळाने डिझाईन सल्लागार व बांधकामासाठी निविदा जाहीर केली आहे.

पेडणेचा बोगदा १,५६१ मीटर व ओल्ड गोवाचा बोगदा ५४४ मीटर लांबीचा आहे. या दोन्ही बोगद्यासाठी अंदाजे १,५०० कोटी खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी ३८ महिने लागण्याची शक्यता आहे.

नवीन बोगदे तयार झाल्यानंतर व कार्यरत झाल्यानंतर जुन्या बोगद्याची दुरुस्ती केली जाईल, असे घाटगे यांनी स्पष्ट केले. या दोन्ही बोगद्यात पावसाळ्यात पाणी गळती होत असते.

तीन ठिकाणी रेल्वे क्रॉसिंग स्थानके

या दोन बोगद्यांबरोबरच गोव्यात तीन ठिकाणी रेल्वे क्रॉसिंग स्थानके बांधण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे या रेल्वे मार्गावरील वाहतूक सुरळीत व सुरक्षित करण्यावर भर देण्यात येत आहे.

ऑगस्ट २०२० साली पावसाळ्यात पेडणे बोगद्यातील बाजूची ५ मीटर लांबीची भिंत कोसळली होती व जवळजवळ ४० दिवस रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला होता. जुलै २०२४ मध्ये सततधार पावसामुळे पेडणे बोगद्यातील रुळ जलमय झाले होते. त्यामुळे कित्येक प्रवासी ट्रेन दुसऱ्या मार्गाने वळविण्यात आल्या होत्या. ओल्ड गोवा येथील बोगदा सुद्धा अधूनमधून दुरुस्तीची प्रतिक्षा करतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Tourism: गोव्याच्या पर्यटनाला 'इंटरनॅशनल' पंख; नव्या देशांशी थेट हवाई जोडणी होणार! पर्यटनमंत्री रोहन खंवटेंची माहिती

पोलिसच दारू ढोसून जीप चालवतो, मुख्‍यमंत्र्यांच्‍या वाहन ताफ्‍याकडे झेपावतो; सामान्यांचं काय?

Kala Academy: कला अकादमीची तज्ञांकडून होणार तपासणी; समितीचा अहवाल आल्यानंतरच बंदबाबतचा निर्णय

Goa Nightclub Fire: हडफडे नाईटक्लब प्रकरण; मृतांच्या वारसांना भरपाई देण्यावर भर; मृतांचे वय, रोजगार, नावासह अहवाल देण्याचे कोर्टाचे आदेश

FIFA World Cup 2026: सामना संपताच डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले...! स्पेनला रोखणारा 'हा' गोलकीपर रातोरात बनला जागतिक स्टार; 50 लाख फॉलोअर्स वाढले

SCROLL FOR NEXT