latest education news Dainik Gomantak
गोवा

Goa Education: दहावीत नापास तरी मिळणार अकरावीत 'एन्ट्री'!! गोव्यात नवीन शिक्षण धोरणानुसार मोठा बदल

New Education Policy Goa: जोपर्यंत विद्यार्थी या विषयांमध्ये उत्तीर्ण होत नाही त्याला पुढील वर्गात प्रवेश दिला जाणार नाही अशी माहिती शालांत मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिलीये

Akshata Chhatre

पणजी: राज्यात नवीन शिक्षण पद्धतीचा अवलंब केल्यापासून काही महत्वाचे बदल होणार आहेत. पुढील वर्षांपासून म्हणजे २०२६-२०२७ पासून दहावीत चार विषयांमध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याला अकरावीत प्रवेश दिला जाणार आहे, मात्र जोपर्यंत विद्यार्थी या विषयांमध्ये उत्तीर्ण होत नाही त्यांना पुढील वर्गात प्रवेश दिला जाणार नाही अशी माहिती शालांत मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिलीये.

शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून इयत्ता दहावीसाठी देखील नवीन शैक्षणिक धोरण लागू केले जाईल. यासाठी शाळांत मंडळाकडून परीक्षा आणि अभ्यासक्रमाचे परिपत्रक जारी केले आहे.

याअनुसर इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सहा शैक्षणिक आणि चार कौशल्याच्या संदर्भातील विषय शिकवले जाणार आहेत.

शैक्षणिक विषयांमध्ये तीन भाषा, जसे की इंग्रजी, हिंदी, मराठी / इतर यासह गणित, विज्ञान आणि समाजशास्त्र असे विषय शिकवले जातील. या सहा विषयांपैकी चार विषयांमध्ये अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना एटीकेटीच्या खात्यातून प्रवेश दिला जाईल.

नवीन शिक्षण धोरणात विज्ञान या विषयासाठी ७० गुण असतील तर इतर विषयांच्या लेखी परीक्षा ८० गुणांच्या असणार आहेत आणि राहिलेले गुण अंतर्गत परीक्षणातून दिले जाईल. आंतरविद्याशाखीय क्षेत्र, एनएसक्यूएफ, कला आणि शारीरिक शिक्षण हे कौशल्याच्या विषय असणार आहेत. या चारही विषयांचे लेखी परीक्षांसाठी ४० गुण असतील आणि अंतर्गत ६०गुण दिले जातील.

दोन कौशल्य विषयांमध्ये ६५ पेक्षा अधिक गुण असल्यास एच किंवा आय ग्रेड असलेल्या शैक्षणिक विषयांमधील गुण सुधारतील, मात्र यासाठी बाकी दोन कौशल्य विषयांमध्ये ५० गुण असणं आवश्यक असणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: आम्ही रशियासह भारतालाही गमावले! राजनैतिक संबंध विकोपाला गेल्याची ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत

Horoscope today: अनंत चतुर्दशी 2025, बाप्पाचा 'या' 4 राशींवर राहील आशिर्वाद; आर्थिक आणि कौटुंबिक जीवनात समृद्धी मिळेल

BITS Pilani: उलटीमुळे श्‍‍वास गुदमरून झाला मृत्‍यू, तणावाखालील ऋषीला नव्हता 'बिट्स'चा आधार; पेशंट स्वतःहून उपचारासाठी आला नाही, ही सबब पुढे

Goa: पाण्‍याचा जितका वापर, तितकेच शुल्‍क; पेयजल विभागाची अधिसूचना जारी, घरगुती ग्राहकांना बिलात सवलत

Goa Education: एकशिक्षकी शाळांचा प्रश्न सुटणार; सरकारी शाळांना अतिरिक्त शिक्षक पुरविले जाणार, CM सावंतांची घोषणा

SCROLL FOR NEXT