Goa Education News Dainik Gomantak
गोवा

Goa Education: शाळा गजबजल्‍या! नवीन शैक्षणिक वर्षाला प्रारंभ; दुरुस्‍तीअभावी काही विद्यालये बंद

Goa Schools: राज्‍यात नवीन शैक्षणिक वर्षाला ४ जूनपासून प्रारंभ झाला. त्‍यामुळे शाळेत जाणाऱ्या चिमुकल्‍यांचा किलबिलाट पुन्‍हा ऐकू आला.

Sameer Panditrao

पणजी: राज्‍यात नवीन शैक्षणिक वर्षाला ४ जूनपासून प्रारंभ झाला. त्‍यामुळे शाळेत जाणाऱ्या चिमुकल्‍यांचा किलबिलाट पुन्‍हा ऐकू आला. शाळा गजबजल्‍या. औक्षण करून मुलांचे स्‍वागत करण्‍यात आले. आनंद आणि उत्सुकता मुलांच्‍या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. परंतु काही शाळांची दुरुस्‍ती झाली नसल्‍याने त्‍यांना सुट्टी वाढवून देण्‍यात आली आहे.

राज्‍यातील बहुतांश शाळा पहिल्‍याच दिवशी पाऊस असूनही गजबजल्‍याचे दिसून आले. काही शाळांची स्‍थिती अजून बिकटच आहे. तारीवाडा-शिरोडा येथील सरकारी शाळेचे छप्पर निकामी झाले असून पालकांनी मुलांना तेथून हलवून अन्य शाळेत दाखल केले.

तर, गुंडेलवाडा, वेळूस-वाळपई येथील सरकारी प्राथमिक शाळेच्‍या छपराची दुरुस्ती महिनाभर रखडल्याने विद्यार्थ्यांना पावसाच्‍या पाण्‍यातच बसावे लागले. तळवाडा-हरमल, आगरवाडा-चोपडे, ताळगाव येथील शाळांची कामे अर्धवट असून, पालक मुलांना शाळांत पाठवण्‍यास घाबरत आहेत.

ताळगाव सरकारी प्राथमिक शाळेच्‍या छपराचे काम अर्धवट स्‍थितीत आहे. तेथील मुलांना जुनी पंचायत इमारतीत हलविले. २७ मे रोजीच या शाळेबाबत आम्ही लक्ष वेधले होते. फळ्याही तशाच आहेत. कामात कोणतेही नियोजन नाही,असे सामाजिक सिसिल रॉड्रिगीस म्हणाल्या.

‘त्‍या’ अभियंत्‍यांवर कडक कारवाई : मुख्‍यमंत्री सावंत

शाळांच्‍या दुरुस्तीत झालेल्या दिरंगाईबद्दल मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, संबंधित अभियंत्यांवर कारवाईचा इशारा दिला आहे. फक्त ४-५ शाळांचे काम अर्धवट असून लवकरच ते पूर्ण केले जाईल, असेही त्‍यांनी सांगितले. तर, शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी सांगितले की, ३८ पैकी १८ शाळांचे दुरुस्तीकाम पूर्ण झाले आहे. मात्र, १५ ते २० शाळांत अद्याप स्वच्छता, इलेक्ट्रिकल अशी कामे उरली आहेत. ताळगाव प्राथमिक शाळेत मुसळधार पावसामुळे अडथळा आला. एक कामगार उंचावरून पडला व दुसऱ्याला विजेचा झटका बसल्याने काम थांबले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT